आव्हाणा शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

जळगाव – तालुक्यातील आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत हाडांचा सांगाडा असलेला मृतदेह आढळून आला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील विद्या नगर येथील मनोज हरिश्चंद्र पाटील यांचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात गट नं ६८८ याठिकाणी शेती आहे. मनोज पाटील हे मंगळवार, ९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात गेले होते.  यादरम्यान शेतातील बोरींगजवळ मनोज पाटील यांना एका अनोळखी व्यक्तींचा कुजलेल्या स्थितीत हांडांचा सांगाडा असलेला मृतदेह आढळून आला. मनोज पाटील यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली, त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहाणी करूण पंचनामा केला. याबाबत बुधवार, १० मे रोजी शेतकरी मनोज पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमका मयत कोण, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सायकर हे करीत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh