9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन व क्रांती दिनी धडक निवेदन आंदोलन

जळगाव – आदिवासी कोळी महासंघ
आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अन्यायग्रस्त आदिवासी जमातीच्या मागण्यांचे निवेदन माजी कॅबिनेट मंत्री डॉ दशरथजी भांडे साहेब आदिवासी नेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या सुचनेने राज्य संघटक प्रशांत तराळे यांच्या मार्गदर्शनाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर या जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकार व आदिवासी विकास विभागाच्या वतीने संविधानाने दिलेल्या घटनात्मक आरक्षणाच्या सुविधा मिळण्यापासून वंचित ठेवण्याच्या अन्यायकारी भूमिकेचा विरोध व निषेध म्हणून या क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर संविधानाने दिलेले आमचे हक्क आम्हाला तात्काळ मिळावेत अन्यथा संघटनेच्या वतीने लवकरच राज्यव्यापी मोठे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या पर्यंत मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे या राज्यव्यापी धडक निवेदन आंदोलनाच्या अनुषंघाने आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती जळगाव जिल्हा तफें उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा पूर्व विभाग / पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व तालूका अध्यक्ष आपल्या तालूकाचे तहसील कार्यालय येथे जिल्हा पदाधिकारी महिला, युवक कर्मचारी समाज बांधव यांच्यासह ९ ऑगस्ट रोजी ११ वाजता मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब व जिल्ह्यातील प्रत्येक तालूकाचे तहसीलदार साहेब यांना देण्यार आहे तरी आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व ३३ अन्यायग्रस्त समाज बांधवांनी या राष्ट्रीय जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आपल्या जमातीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मागण्यां संदर्भात शासनाचे लक्ष वेधन्यासाठी ९ ऑगस्ट रोजी ११ वाजता सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालूकाचे तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून आपल्या मागण्यांच्या निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना देण्याकरीता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय भाऊ कांडेलकर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष रविन्द्र शेठ नन्नवरे जळगाव महानगर अध्यक्ष किशोर भाऊ बाविस्कर सचिव मनोहर कोळी मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे उपाध्यक्ष शंभू अण्णा शेवरे यांच्या सह कर्मचारी, महिला युवक जिल्हाध्यक्ष तालूका अध्यक्ष शहर अध्यक्ष सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.