ममुराबाद – : लाडकी बहीण योजनेला राज्यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण योजनेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. बँकिंग आणि प्रशासकीय यंत्रणेवर पण त्याचा एकच ताण आला आहे. या बॅकेमध्ये तर दरदिवशी चेंगराचेंगरी सारखे प्रकार घडत असल्यामुळे बऱ्याच वेळेस महिला भोवळ येऊन पडतात.
लाडकी बहीण योजन राज्यात चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी मोठी झुंबडी उडाली आहे. तहसील कार्यालय, सेतू, बँकांसमोर महिलांची रांगच रांग लागली आहे. महिलांना या योजनेसाठी मोठी कसरत करावी लागली तर आता बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेत पण मोठी गर्दी झाली आहे. गर्दी आवरण्यासाठी वारंवार पोलीस यंत्रणा मागवावी लागत आहे. तरी सुद्धा चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत.
ममुराबादच्या सेंट्रल बँक शाखेत महिलांची अलोट गर्दि पहावयास मिळत आहे. त्यामध्ये बॅकेत आजुबाजुच्या खेड्यामधील खातेदार असल्याने मोठ्या प्रमाणा गर्दी होत असते. बॅकेत ई केवायसी साठी आणि पैसे काढण्यासाठी खेड्यापाळ्याहून महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी झाली होती. बँके विभागाच्या कुठलाच नियोजन नसल्यामुळे महिलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. बऱ्याच वेळेस महिलांनमध्ये हाणामारी देखील होत असते. यामध्ये गर्दीमध्ये बऱ्याच महिलांना भुवळ सुद्धा आल्याने त्यांना तात्काळ दवाखाण्यात हलवण्यात आहे. बँकेत होणाऱ्या गर्दीमुळे काहि विपरीत परिणाम घडण्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील येथील ग्रामस्थांना पडला आहे.
केवायसीसाठी स्वतंत्र रांग आणि हवा येण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने हा असले प्रकार घडत आहे. तोबा गर्दीमुळे महिलांना श्वास घ्यायला पण अडचण येत आहे. त्यामुळे येथे उपस्थित काही महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महिलांचा विनयभंग होण्याची शक्यता
ई केवायसीसाठी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी दिसली. ई केवायसी करण्यासाठी बँकेसमोर रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या. बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचे काही महिलांनी बोलून दाखवले मात्र छेडखानी संदर्भात कोणत्याही महिलेचे पोलिसात अद्यापही तक्रार नाही. योजना जरी चांगली असली मात्र याच्यात होणारा त्रास अधिक असल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बँकेत चेंगराचेंगरीचे प्रकार होत आहे मात्र बँकेच्या बाहेर कुठलेही सुरक्षा रक्षक दिसत नाही आहे….