असोदा केंद्राचा शाळा पूर्वतयारी मेळावा “पहिले पाऊल” हे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

जळगाव –  आसोदा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा “पहिले पाऊल “हे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले .या प्रशिक्षणात आसोदा केंद्रांतर्गत इयत्ता- 1ली ते 5वी सर्व शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, स्वयंसेविका यांनी सहभाग नोंदवला .या प्रशिक्षणात शिक्षकांकडून ऍक्टिव्हिटीज करून घेण्यात आल्या. तसेच शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे सात स्टॉल्स प्रात्यक्षिक स्वरूपात लावण्यात आले. दवंडी प्रभात फेरी तसेच सेल्फी पॉईंट हे ह्या प्रशिक्षणाचे खास आकर्षण होते. उपस्थित सर्व शिक्षकांच्या गटकार्यातून स्टॉलची मांडणी, विद्यार्थी प्रवेश, प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांकडून ऍक्टिव्हिटी करून घेणे ,पालकांना मार्गदर्शन करणे इत्यादी कृती करून घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोदा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री वाघेसर होते .अध्यापनात वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले ज्ञानदान प्रामाणिकपणे पोहोचवा .विद्यार्थी हेच आपले दैवत मानून निश्चित उद्दिष्टापेक्षा थोडे जास्तच द्या असे भावनिक आव्हान केले. कार्यक्रमास प्रशिक्षक म्हणून श्रीमती कल्पना चौधरी उपशिक्षिका ममुराबाद व श्री वानखेडे सर आव्हाने यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षकांनी सहकार्य केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh