“अशी ही भन्नाट भिंगरी” मराठी चित्रपटाची आभिनेत्री सुरपूर यांची मातोश्री जयश्री यांचे कोरोनाने निधन “कन्येला अभिनेत्री बघायचं स्वप्न अर्धवटच “

 

पुणे (सु.ज्ञा.भोसले) – अशी ही भन्नाट भिंगरी हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच अभिनेत्री आशू सुरपूर यांच्या मातोश्री जयश्री सुरपूर यांचं कोरोनाने निधन झालं, आपल्या कन्येला अभिनेत्री बघायचं त्यांचं स्वपन अर्धवटच राहिलं, आशुला आभिनेत्री म्हणून बघायची त्यांची खुप इच्छा होती मात्र नियतीने अवेळी त्यांना हिराऊन घेतलं, “अशी ही भन्नाट भिंगरी” ही धम्माल प्रेम कहाणी असलेला मराठी चित्रपट आहे, उरणच्या निसर्गरम्य वातावरणात सोबतच समुद्रकाठी चित्रित झालेली ही प्रेम कहाणी, प्रेक्षकांना खूप आवडेल असे अभिनेत्री आशु सुरपुर यांनी सांगितलं,

खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास, विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीसाई समर्थ चित्र प्रस्तूत जनार्दन म्हसकर निर्मित तथा संजीव यशवंत कोलते दिग्दर्शित हा चित्रपट मोठी धम्माल करणार असल्याचेही त्या म्हणाल्या,

आशु सुरपुर लहानपणा पासुन खुप हुशार होती,तिच स्वपंन होत मराठी चित्रपटामध्ये काम करावं,आज तिची ती ईच्छा पूर्ण झाली आहे,,आशु ने पुढचं पाऊल टिव्ही सिरयलमध्ये भुमिका केली आहे,प्रसिद्ध मराठी चित्रपट “झाला बोभाटा,तु ही रे, मोहर,दुनिया गेली तेल लावत , चालु द्या तुम्ही , प्रधानमंत्री चित्रपट अशा अनेक मोठ्या कलाकारांसोबत कामे केली आहे. गेली ९ वर्ष मराठी चित्रपटामध्ये काम करते आहे ,मात्र तीच्या मुख्य भूमिकेत असणार हा मराठी चिञपट “अशी ही भन्नाट भिंगरी” लवकरच प्रदर्शित होत आहे हा चिञपट प्रेक्षकांना आवर्जून सिनेमागृहात बघायला जावा असेही आशु सुरपुर म्हणाल्या त्यांची ही छोटेखानी मुलाखत आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष संपादक उत्कृष्ट पत्रकार विजेता सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी पुणे येथे घेतली त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील आपल्या भुमिकेबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.तथा प्रेक्षकांनी हा चित्रपट बघण्यासाठी जरुर सिनेमाघरात जावे खुप आनंद मिळेल शेवटी असेही त्या म्हणाल्या.