अरविंद केजरीवाल यांनी केली ३ दिवसांची सुट्टी जाहीर; शाहरुख खानच्या चाहत्यांना बसला मोठा धक्का…

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता दिल्लीतील चाहत्यांसाठी ‘जवान’ बाबत एक माहिती समोर आली आहे. काय आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी वाचा…

मुंबई – सनी देओलच्या ‘गदर २’ नंतर आता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट धमाका करण्यासाठी बॉक्स ऑफिसवर येत आहे. हा चित्रपट आता थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान सध्या बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ने धुमाकूळ घातला आहे. आता २५ ऑगस्ट रोजी कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘ड्रीम गर्ल २’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता सरकारने ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाबाबत खूप उत्सूक आहेत, मात्र सरकारी सुट्टीमुळे शाहरुखच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहेत.

केजरीवाल यांनी ३ दिवसांची सुट्टी का जाहीर केली : राजधानी दिल्लीत ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जी २० ( G20) परिषद होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सरकारी आणि खासगी शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या या तीन दिवसांच्या सुट्टीच्या घोषणेमुळे शाहरुख खानचे दिल्लीतील चाहते नाराज झाले आहेत. ‘जवान’ ७ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. मुंबईनंतर दिल्लीत शाहरुखचे चित्रपट सर्वाधिक चालतात. अनेकदा सुरुवातीच्या आठवड्यात सर्वाधिक कमाई दिल्लीत होते. यादरम्यान दिल्लीतील चित्रपटगृहे बंद राहिल्यास ‘जवान’चे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर फक्त नवी दिल्लीतील चित्रपटगृहे बंद राहिली तर कमी नुकसान अपेक्षित आहे, कारण प्रेक्षक दिल्लीतील इतर चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकेल.

केजरीवाल यांच्या घोषणेवर चाहत्यांची प्रतिक्रिया : केजरीवाल यांच्या घोषणेवर एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘सत्य बोला केजरीवालजी, तुम्हाला देखील ब्लॉकबस्टर ‘जवान’ चित्रपट पाहायचा आहे ना?’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘७ ते १० सप्टेंबर या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ची चांदी होणार आहे.’ साऊथ दिग्दर्शक एटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, संजय दत्त आणि दीपिका पदुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी