मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत

छत्रपती संभाजीनगर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी येथील विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पणन व अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे,विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आदी उपस्थित होते.