उमवि बीबीए प्रवेशासाठी या तारखेपासुन प्रवेश परीक्षा; या संकेतस्थळावर करा अर्ज

जळगाव – व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत बीबीए (मॅनेजमेंट) हा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू होत आहे.

यामध्ये मेजरसाठी मार्केटिंग किंवा एचआरएम किंवा फायनान्स तसेच मायनरसाठी डाटा सायन्स किंवा इकॉनॉमिक्स हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत बीबीए (मॅनेजमेंट) या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार असून त्यासाठी २३ जूनला प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २३ जूनला प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाईल. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर माहितीपुस्तक आणि अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

बारावी उत्तीर्ण झालेल्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा अभ्यासक्रम सुरू होत असून अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रा. रमेश सरदार अथवा समन्वयक डॉ. यशोदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे यांनी केले आहे.