कलादर्शन ड्राॅईंग क्लासेस तर्फे एलेमेंटरी परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा

जळगाव – येथिल पिंप्राळा परीसरातील कलादर्शन ड्राॅईंग क्लासेस तर्फे एलेमेंटरी परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा दि.५ मार्च रोजी पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी च्या प्रतीमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एलेमेंटरी परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थाना बक्षीस देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ललित कला केंद्र चोपडा येथील सेवानिवृत्त गुरुवर्य राजेंद्र महाजन सर, आर.आर. शाळेचे कलाध्यापक बन्सीलाल सुतार सर व क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था (दादावाडी) चे सचिव राजेंद्र सोनवणे यांची उपस्थीती लाभली. मुलांना कलेची आवड असेल तर पालकांनी त्यांच्या ललीत कलेस प्रोत्साहन दिले पाहिजे.असे उद्गार राजेंद्र महाजन सर यानी आपल्या अध्यक्षिय भाषणात पालकांना दिले.

तसेच बन्सीलाल सुतार सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, कलावंत हा भाग्यवंत आहे, कारण परमेश्वराने त्यांना दिलेले ते वरदान आहे. क्लास संचालक विजय चव्हाण सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व मार्गदर्शन केले.व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेजस्विनी चव्हाण व जान्हवी जोशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सार्थक जैन, दक्ष पाटील,महेंद्र महाजन,प्रणव पाटील,पद्मज माळी यांनी परिश्रम घेतले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh