मुंबई – संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या येण्याचे स्पष्ट संकेत सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांनी दिले आहेत. त्यानंतर वेगवेगऴ्या राजकिय आणि कायदेतज्ञांच्या प्रतिक्रिया येत असून जेष्ठ वकिल आणि कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी उद्या 16 आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असा गोप्यस्फोट केला आहे.
एका खाजगी न्यूज चॅनेलवर बोलताना उल्हास बापट म्हणाले “अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी घेण्यात आला असल्याने तो पुर्णता घटनाबाह्य आहे. आणि हा जर निर्णय चुकिचा आहे अस सिद्ध झालं तर सुप्रिम कोर्ट स्टेटसको अँटी म्हणजेच पुर्वपरिस्थिती आणू शकते. कायद्यामध्ये यासाठी तरतूद आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.