अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा चौकशी

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी आर्यन खानच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये नाव आलेली अभिनेत्री अनन्या पांडे सध्या एनसीबीच्या रडारवर आहे. एनसीबीने तिला समन्स बजावले असून, आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आर्यन खान क्रूझवरील ड्रग्ज पार्टी दरम्यान अनन्या पांडेच्या संपर्कात होता. दोघांमध्ये गांजा संदर्भात चर्चा झाल्याचे व्हॉटस् ऍप चॅटमधून समोर आले आहे. आर्यन अनन्याला गांजाविषयी विचारत होता. गांजा मिळवण्यासाठी तू काही जुगाड करू शकते का? असं त्याने तिला विचारलं होतं. त्यावर मी तुला ते मिळवून देईन, असं उत्तर अनन्याने दिले होते.

दरम्यान, या प्रकरणात गुरुवारी एनसीबीने अनन्याला समन्स बजावलं होते. गुरुवारी तिची दोन तास चौकशी झाली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा तिला चौकशीसाठी बोलाविण्यात आले. त्यावेळी तिचे दोन मोबाईल आणि लॅपटॉप एनसीबीने ताब्यात घेतले. एनसीबीने अनन्याला पुन्हा समन्स पाठवून आज तिसऱयांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh