आनंदाच्या शिध्यात मिळणार मैदा आणि पोहेही; मंत्रिमंडळाचा निर्णय

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय आज (दि.३) मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decisions) घेण्यात आला आहे. याआधी देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येत होते.

मात्र यावेळी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यात येणार असून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येणार असून ४५ पदांना मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh