आनंदाची बातमी ! पेट्रोल आणि डिझेल चे दर 10 रुपयांनी होणार कमी

आनंदाची पेट्रोल आणी डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे महागाई भिडलेली आहे यात सामान्य माणसाला आपले दररोजचे जावं जगणे कठीण झालेलं आहे . येणाऱ्या आगामी काळ होणाऱ्या निवडणुकीच्या पार्षव भूमी सरकार कडून पेट्रोल आणि डिझेल चे दार कमी करण्याचा विचार सुरु आहे . रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी योजना आखली जात आहे. सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 8 ते १० रुपयांपेक्षा जास्त कपात करण्याची घोषणा करू शकते.

कॅलेंडर वर्ष संपण्यापूर्वीच याची घोषणा केली जाऊ शकते अशी बातमी समोर येत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला

आहे, ज्यामध्ये दोन्ही इंधनांमध्ये प्रतिलिटर 8 ते 10 रुपयांची कपात करण्यात आली असून, तो लवकरच मंजूर होऊ शकतो.

सरकारी तेल कंपन्यांना मोठा फायदा

6 एप्रिल 2022 पासून सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाच्या रिफायनरीपूर्व किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चालू आर्थिक वर्षात, कच्च्या तेलाच्या कमी किमतीमुळे इंडियन ऑइल कॉर्प (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्प (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प (HPCL) या तीन सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड नफा मिळाला आहे. यासह, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, IOC, BPCL आणि HPCL यांनी संयुक्तपणे 58,198 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

पेट्रोलचे दर किती ?

दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) तुम्हाला पहाता येऊ शकतात .

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

jalgaonsandesh

jalgaonsandesh