ग्रा.पं.ममुराबाद येथे २०२०-२१ चे कालावधीत प्रशासक एन डी ढाके यांचा प्रताप,अतिक्रमण कायम करण्यासाठी ८५ हजार रुपये घेतल्याचा आरोप

ममुराबाद-: पंचायत समितीचे. एन.डी. ढाके, तत्कालीन प्रशासक मौजे ममुराबाद ग्रा.पं. व सद्यस्थितीत सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती, हे ममुराबाद येथे १५ सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत प्रशासक म्हणून होते. त्या कालावधीत २०१८ च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन तुमचे अतिक्रमण कायम करूण देतो असे तक्रारदार महेंद्र सोनवणे यांना सांगीतले. परंतु तुम्ही केलल्या अतिक्रमणाची जागा मोठी असल्यामुळे तुम्हाला ८५००० हजार रुपये इतकी फि द्यावी लागेल. त्या अतिक्रमीत जागेवर माझ्या पत्नीचे भोगवटा धारक म्हणुन नोंद करूण देईन असे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या या मागणीला तक्रारदार महेंद्र सोनवणे हे देखील दिलेल्या पैशाची पावती मिळत असल्यामुळे पैसे द्यायला तयार झाले. परंतु ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाल्यावर फिचे पैसे द्यावयाचे ठरले. त्यानंत प्रशासक ढाके यांनी आदेश क्र.२९, दिनांक १०/०१/२०२१ अन्वये भोगवटाधारक यांचे ग्रा.पं.दत्परी न.नं.८ ला भोगवटा सदरी नोंद होणेस्तव व अतिक्रमण नियमानुकुल करुन परिशिष्ठ ‘अ’ भरणेत येवुन शासनाच्या संकेत स्थळावर नोंद करणे बाबत आदेश नोंदवहीत आदेशीत केलेले आहे. त्यानुसार त्याच अतिक्रमण जागेची दिनांक २४/०९/२०२१ रोजी घरपट्टी नावाने २०२१/२२ साठी र.रु. ८८४/- व र.रु.३००/- पाणीपट्टीसाठी वसुल केलेली आहे. तद्नुसार नमुना नं.८ ला अतिक्रमण नियमानुकुल करुन नोंदी करण्याबाबत तत्कालीन प्रशासक श्री. एन.डी.ढाके यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीस आश्वासन दिले होते. सदर अतिक्रमण नियमानुकुल करुन त्यासंदर्भात नोंदी करण्याबाबत तत्कालीन प्रशासक श्री.एन.डी.ढाके यांनी तक्रारदार महिंद्र सोनवणे त्यांच्या पत्नीसमक्ष व्यक्तिशः रक्कम रुपये ८५,०००/- मात्रची फी म्हणुन मागणी ही दिनांक १०/०१/२०२१ रोजीच केली होती. सदर अतिक्रमण हे नियमानुकुल होवुन त्यासंदर्भात नोंदी करण्यात आल्यानंतर सदर रक्कम रुपये ८५,०००/- मात्र फी म्हणुन तत्कालीन प्रशासक श्री. एन.डी. ढाके यांना अदा करण्याबाबत तक्रारदार यांनी मान्य देखील केलेले होते. त्यानुसार गांव.न.नं.८ ला अतिक्रमण नियमानुकूल करुन नोंदी करण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर प्रकरणी सचिव म्हणुन ग्रामसेवक यांच्या देखील बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत.तक्रारदार यांचेकडे रोख रक्कम नसल्याने पत्नीचे खाते असलेल्या अॅक्सिस बँक, शाखा – गोविंदा रिक्षा स्टॉप, जळगांव येथील खाते क्र. ९१३०१००२९१६११७९ या खात्याद्वारे दिनांक २१/०९/२०२१ रोजी ऑनलाईन पध्दतीने रक्कम रुपये ५०,०००/- + ३५,०००/- + असे एकुण रक्कम रुपये ८५,०००/- दिलेले आहे. परंतु सदर रकमेची आजपर्यंत पावती दिलेली देखील नाही.

ग्रामपंचायत ममुराबादचे निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीने दिनांक २५/१०/२०२१ चे मासिक सभेत तत्कालीन प्रशासक श्री. एन.डी. ढाके यांनी केलेला दिनांक १०/०१/२०२१ चा आदेश / ठराव रद्द करुन सदर आदेशात आमचे भोगवटाधारकांचे नांव न.नं.८ वरील नोंदी ग्रामसभेच्या ठरावात समाविष्ठ नसल्याने रद्द करण्यात यावा असा ठराव क्र.६/१ नुसार मंजुर करुन नियमानुकुल केलेले भोगवटाधारकांची न.नं.८ वर घेण्यात आलेल्या नोंदी रद्द केलेल्या आहेत. प्रशासक श्री. एन.डी. ढाके यांनी मागणी केलेली रक्कम त्यांना दिलेली असुन त्यांनी तक्रारदारास कोणत्याही प्रकारची पावती दिलेली नसल्याने तक्रारदार ग्रामपंचायतीला ही बाब दाखवु शकत नाही. तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या खात्यावरून गुगल पे च्या सहाय्याने ऑनलाईन पैसे दिलेले आहे.

वरील सर्व बाबी पाहता, श्री. एन.डी. ढाके यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीकडुन अतिक्रमण नियमित करणेस मागणी केलेली फी देवुन देखील ग्रामसभेत अतिक्रमण नियमित केलेले नाही व तक्रारदार यांनी भरलेल्या पैशांची पावती मागणी केली असता, त्यांनी नकार दिला, ही बाब योग्य नाही. सबब आपण आपले कार्यालयास श्री. एन.डी.ढाके यांना बोलावुन आम्ही फी दिलेली असतांना ग्रामसभेत ठराव न घेता आमची दिशाभुल केलेली असल्याने त्यांनी प्रशासक पदाचा गैरफायदा घेवुन मोठ्या प्रमाणात अपहार केलेला असल्याने दिसुन येत आहे. नियमानुसार त्यांचेवर प्रशासकीय कारवाई करणेत येवुन तक्रारदाराकडून दिलेल्या फी ची पावती मिळुन सदर अतिक्रमणास नियमानुकुल करुन ग्रामसभेत ठराव घेणेत येवुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तक्रारदार यांनी म.विभागीय आयुक्त सो नाशिक विभाग नाशिक,म.मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव,म.जिल्हाधिकारी सो जळगाव,म पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत विभाग जळगाव, यांचे कडे करण्यात आलेली आहे.

ताजा खबरें