भुसावळ येथे मालवण येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर धिक्कार सभेचे आयोजन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – मालवण येथे आठ महिण्यापुर्वी दि.४ डिसेंबर २०२३ रोजी छ. शिवाजी महाराजांचा निकृष्ट दर्जाचा पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तो पुतळा एक वर्षाच्या आत कोसळला. हा भाजपाचा भ्रष्टाचार छ. शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या या घटनेचा तीव्र शब्दात “धिक्कार” करण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे.

तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी दि. २८/८/२०२४ रोजी बुधवार वेळ सकाळी ११ वा ठिकाण – छ. शिवाजी महाराजांचा पुतळा, रेल्वे स्टेशन जवळ, भुसावळ येथे वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख निलेश महाजन व दीपक धांडे, बबलू बऱ्हाटे शहर प्रमुख, शिवसेना (उबाठा) भुसावळ यांनी केले आहे.

ताजा खबरें