अजित पवार होणार का राज्याचे नवे अर्थमंत्री?

मुंबई – राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीतील इतर आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र दि. १० जुलै रोजी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीजदर सवलतीच्या जीआर वरून देवेंद्र फडणवीसांकडील अर्थखाते अजित पवार यांच्याकडे गेल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे अजित पवार हे राज्याचे नवे अर्थमंत्री असतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऊर्जा खात्याशी संबधित या GR मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा खाते असा उल्लेख आहे. पण वित्त खात्यांच्या रकाण्यासमोर कोणतेही नाव नाही.त्यामुळे अर्थमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजितदादांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याची जोरदार चर्चा आहे.