लोकसभेतील दारुण पराभवानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची बैठक बोलवली आहे. ट्रायडेंट हॉटेवर ही बैठक सुरू आहे. पराभवानंतर अजित पवाराच्या गटातील आमदारांना विधानसभेची भिती वाटू लागली असून अनेकांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा विचार सुरू केल्याचं बोललं जात आहे.
अशातच अजित पवारांच्या आजच्या बैठकीला चार आमदारांनी गैरहजेरी लावली आहे. धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनिल टिंगरे, राजेंद्र शिंगणे हे चार आमदार या बैठकीला उपस्थित नाहीत. मात्र त्यांच्या गैरहजेरीचं कारण देखील समोर आलेलं आहे. नरहरी झिरवळ हे परदेशात आहेत. तर धर्मराव बाबा आत्राम आणि राजेंद्र शिंगणे हे आजारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुनिल टिंगरे हे बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे, असं टीव्ही 9 च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.