कुऱ्हा पानाचे येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार करुन अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.         

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील नावलौकिक केलेल्या तरुण तरुणी यांचा सत्कार करुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुशिक्षित होऊन सुसंस्कृत पीढी निर्माण व्हावी. आजकालचे तरुण चांगले शिक्षण घेत आहेत परंतु त्याचबरोबर आपली संस्कृती टिकायला हवी. आपले संस्कार टिकायला हवेत. आई वडिलांचा आदर करवा. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. काही लोक फक्त फोटोसाठी वृक्ष लागवड करतात. परंतु ते टिकवण्यासाठी त्यांना वेळोवेळी पाणी देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक, राजमाता, अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त शुक्रवार दि. ३१ मे रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच गावातील ४० गुणवंतांचा सन्मानपत्र देऊन शुक्रवारी जयंती साजरी केली. संध्याकाळी गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

दरवर्षी १०वी , १२वीत उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी, वर्षभरात गावातील जे तरूण सरकारी नोकरीत रुजू झाले आहेत. तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, नोकरी, महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांना अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येते.

सन्मानित केलेल्यांचे कार्य आपापल्या क्षेत्रात असेच उदंड चालु राहण्यासाठी व इतरांना प्रेरणा मिळावी हा सन्मानपत्राचा हेतु आहे. असे आयोजकांनी सांगितले. माजी ग्रा. पं सदस्या नलीनी धोंडू गांधेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय सावकारे, तलाठी विशाखा मून, पोलीस पाटील मनीषा अरविंद बावस्कर,माजी जि प सदस्य समाधान पवार, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरीक, विविध समाजातील समाजसेवक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सखी मंचाचे सदस्या, म्हाळसा माता महिला बचत गटाच्या सदस्या, तसेच गावातील महिला बचतगट सदस्या,

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले गावातील तरुण, त्यांचे पालक व धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गावातील जे तरूण गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात सरकारी नोकरीला लागले आहेत असे तरूण, एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेले व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले १०वी व १२ वीचे विद्यार्थी व पानवेल क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त शेतकरी रमेश बोबडे यांचा सत्कार असे एकूण ४० जनांना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन समाजाच्या वतीने गौरवण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.