अहिल्यादेवी होळकर संदेश रथयात्रेचे आयोजन

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षा निमित्ताने अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती सर्व जाती धर्मातील लोकांना व समाजाला माहीत होण्यासाठी, त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी केलेले कार्य, समाज जनजागृती, आणि समाज संघटनासाठी , आपल्या समाजामार्फत जळगाव जिल्ह्यात 3 दिवसीय अहिल्या संदेश रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले.आहे सदरची संदेश रथयात्रा भुसावळ तालुक्यात फक्त साकेगाव व भुसावळ शहर येथून रावेर कडे जाणार आहे. दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोज बुधवार ला ठिक 12 वाजता अहिल्या स्मारक लोणारी हॉल जळगाव रोड, भुसावळ येथे अहिल्या संदेश रथ यात्रेचे आगमन होणार आहे.

यासाठी महादेव मंदिर लोणारी हॉलच्या मागील बाजूस आपल्या समाजामार्फत कार्यक्रमाचे आयोजन केले असून समाजाची अस्मिता असलेल्या अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार तसेच ग्रामीण भागातील ज्या समाज बंधूंना शक्य आहे त्यांनी आपल्या परिचित लोकप्रतिनिधी सह कार्यक्रमास उपस्थित राहावे. हि नम्र विनंती जय अहिल्या जय मल्हार

ताजा खबरें