वराडसिम येथील आगळावेगळा पोळा! (खिडकीतून कुदवला जातो बैल)

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील पोळा हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो . याबाबत सविस्तर असे असे की सुमारे ३०० वर्षांपूर्वी नारायण राघो पाटील या राजपूत समाजाच्या माणसाला काही एक अपत्य नसल्याने वराडसिम गावात आपले नाव रहावे या उद्देशाने त्यांनी त्या काळी अवघे पंचवीस रुपये खर्च करून गावाला एक मुख्य अवाढव्य गाव दरवाजा बांधून दिलेला आहे त्या दरवाजा ला अडीच बाय तीन ची खिडकी ठेवलेली असून पूर्वी रात्रीअपरात्री येणाऱ्याची शहानिशा केल्यावरच दरवाज्याच्या वर बांधलेल्या बंगल्यात असलेला रखवालदार त्या खिडकीतूनच बाहेर जाऊन आलेल्या माणसाला प्रवेश देत होता प्रवेश देत होता कालांतराने या दरवाजाचा पोळा या सणासाठीवापर होऊ लागला पुण्याच्या दिवशी हा गाव दरवाजा बंद करून त्या अडीच बाय तीन च्या खिडकीतून बैल कुदवण्याची साधारणत: दुपारी २ वाजता शर्यत सुरु होते.त्या अगोदर काहीनी आपली मनोकामना पुर्ण होण्यासाठी बैलाच्या शिंगाला बाशिंग बांधुण मिरवणुक काढण्याचे कबुल केलेले असते त्या बैलास मानाचा बैल म्हणुन मिरविले जाते.या बैलाची मिरवणुक साधारणत:१ वाजता सुरु होते. हा मानाचा बैल गावदरवाज्यातुन गेल्याशिवाय गावदरवाजा बंद केला जात नाही.मानाचा बैल गेल्यानंतर नारळाच्या दोरीचे तोरण टाकले जाते.हे तोरण तोडण्यासाठी लोकांची झुबंळ उडते. या दोरीचा तुकडा अंघोळीच्या पाण्यात टाकुन अंघोळ केल्यास करणी कवटाळ भुत पिशाच्च बाधा होत नाही हा समज आहे.दरवाजा बंद केल्यावर फक्त खिडकि उघडली जाते.व या खिडकीतुन आपलाच बैल कुदावा या साठी शर्तीची रस्सीखेच सुरु होते.व खिडकीतुन कुदलेल्या बैलाच्या मालकाला बक्षीस दिले जाते.गावातील सर्व जातीपातीचे व धर्माचे लोक एकत्र यावे हा यामागील पुर्वीपासुन चालत आलेला उद्देश आजतागायत सुरू आहे.हा सण आनंदात साजरा करावा.

भांडणतंटे करु नये. गावाचे नाव खराब होणार नाही याची सर्वांनी लक्ष द्या असे आवाहन भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस पाटील सचिन वायकोळे , सरपंच निलप्रभा पाचपांडे, उपसरपंच विजय पाटील, सर्व सदस्य काशिनाथ पाटील, माजी सरपंच तथा सदस्य विलास पाटील, प्रकाश ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष देविदास नाईक, उपाध्यक्ष उत्तम सोनवणे, पत्रकार बापू सोनवणे, चेतन खाचणे, यांनी केले आहे.

ताजा खबरें