हजारच्या बदल्यात 1300 रुपये दिले; त्यानंतर महिलेला बसला धक्का, बँक खात्यातून स्कॅमरने 36 लाख उडवले

पुणे – एका महिलेला स्कॅमरने आपल्या जाळ्यात अडकवले. महिलेने 1300 रुपयांच्या अमिषापोटी मेहनेतीचे एक-दोन नाही तर तब्बल 36 लाख रुपये गमावले.

स्कॅमरने हा खेळ 12 दिवसांपर्यंत खेळला. पुण्यातील 33 वर्षीय इंटेरियर डिझायनर महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला आहे. त्यामध्ये तिच्या खात्यातील 36 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत.

पीडित महिलेला इन्स्टंट मॅसेजिंग अॅपवर एका अनोळखी नंबरवरुन मेसेज आला. या मेसेजमध्ये एक गलेलठ्ठ पगाराची पार्ट टाइम जॉबची ऑफर देण्यात आली. 26 सप्टेंबरला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने तिच्यासोबत प्रथम संपर्क केला. हा मेसेज एका इंटनॅशनल नंबरवरुन आला होता. त्याने स्वतःला एका कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचे सांगितले. तो त्या कंपनीत सोशल मीडिया अकाऊंट्सचे रिच वाढवण्याचे काम करत असल्याची माहिती त्याने महिलेला दिली.

इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो करण्यास सांगितले

काही प्रश्नोत्तरानंतर पीडित महिलेला स्कॅमरने एक इन्स्टाग्राम हँडलची लिंक पाठवून त्या अकाऊंटला फॉलो करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला काही टास्क दिले, जे पीडित महिलेने पूर्ण करुन त्याचे स्क्रिन शॉट्स स्कॅमरला शेअर केले. त्यानंतर पीडित महिलेने तिचे बँक डिटेल्स स्कॅमरसोबत शेअर केले. पीडितेने काही टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात काही रक्कमही जमा होत गेली.

स्कॅमरने सांगितला हाय रिटर्न प्लॅन

काही दिवसानंतर आणखी एका व्यक्तीचा महिलेला फोन आला, त्याने तिला हाय रिटर्न प्लॅन सांगितला. त्यानंतर पीडित महिलेला प्रीपेड टास्क निवडण्यास सांगितले. यामध्ये हाय रिटर्नची अमिष देण्यात आले. या प्लॅनचे नाव मर्चंट टास्क होते.

सुरुवातीला पेमेंट मिळाला आणि नंतर धोका

तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, तिने 1000 रुपये गुंतवले, त्या बदल्यात तिला 1300 रुपये मिळाले. त्यानतंर तिने 3000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 3900 रुपये नफा कमावला.

पीडितेला त्यानंतर 25 हजार रुपये, 1 लाख रुपये, 3 लाख रुपये आणि 5 लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. या सर्व गुंतवणुकीसाठी एकच टास्क देण्यात आला. त्यानंतर पीडितेने जेव्हा गुंतवणुकीवरील नफा मागितला तेव्हा स्कॅमरने तिला सिस्टम डाऊन झाल्याचा बहाणा सांगितला आणि एक-दोन दिवसांमध्ये पेमेंट मिळण्याचे आश्वासनही दिले.

त्यानंतर पीडितेला सांगण्यात आले की तुमचा परफॉर्मन्स फारच वाईट आहे. त्यामुळे त्यांना नवे टास्क दिले जातील आणि ते लवकरात लवकर पूर्ण करावे लागेल. तसे केले नाही तर तुम्ही गुंतवलेले पैसे ब्लॉक होण्याची भीती आहे. या दरम्यान महिलेने 500 रुपयांपासून 4 लाख रुपयांपर्यंत कित्येक ट्रांझेक्शन केले होते. त्यानंतर जेव्हा महिलेला रिटर्न मिळणे बंद झाले तेव्हा पीडितेच्या लक्षात आले की आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असून आपण स्कॅमरची शिकार झालो आहोत. तोपर्यंत त्यांच्या अकाऊंटमधून 36.5 लाख रुपये स्कॅमरच्या खात्यात वळते झालेले होते.

ताजा खबरें