शालेय पुस्तकांना कोरी पाने जोडणे निरुपयोगी, शिक्षण क्षेत्रातील सूर : थेट वह्याच मोफत किंवा अल्पदरात देण्याची मागणी

पुणे – पाठय़पुस्तकातच वह्यांची कोरी पाने जोडण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय निरुपयोगी असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दप्तराचे ओझे कमी होणार नाही, विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकाचा सलग अनुभव मिळणार नाही.

त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना थेट वह्याच मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, गरीब विद्यार्थ्यांना वह्या खरेदी करण्यात आर्थिक अडचणी येत असल्याचे नमूद करून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडण्याची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर पाठय़पुस्तकांत कोरी पाने जोडण्याच्या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनवंती हर्डीकर म्हणाल्या की, ”पहिली ते दहावीच्या पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडणे योग्य नाही. विशेषत: पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग नाही. कोरी पाने जोडल्याने पाठय़पुस्तकाला पुस्तक हे स्वरूपच राहात नाही. छापील पुस्तके सलगपणे वाचण्यात काहीएक अर्थ असतो. संपूर्ण वर्षांत मुलांचा विकास लक्षात घेऊन पुस्तकाची रचना केलेली असते. पण, आता ती पुस्तके तुकडय़ातुकडय़ांत दिल्याने मुलांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. नवी पाठय़पुस्तक रचना हा परीक्षा केंद्रित विचार आहे. दप्तराचे वजन पाठय़पुस्तकांमुळे नाही, तर खासगी पुस्तके, मार्गदर्शक पुस्तकांमुळे वाढते. त्यामुळे या पुस्तकांना आळा घालणे आवश्यक आहे.”

”पाठय़पुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येऊनही शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. पाठय़पुस्तकांत कोरी पाने जोडण्यामागे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्याचे कारण दिले जात असले, तरी गृहपाठ, वर्गकार्य आणि नोंदीसाठी स्वतंत्र वह्या ठेवण्याची सूचना आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्याचा उद्देश सफल होणार नाही. कागदाची दरवाढ आणि दरवर्षी नवी पुस्तके घेण्याच्या आवश्यकतेमुळे पालकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. नवी पुस्तके शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना, प्रचलित पुस्तके खासगी, विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना देणे हा भेदभाव आहे. त्यामुळे पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे,” असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

वजन वाढणार आहे. तसेच चार भाग केल्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच्या पुस्तकातील संदर्भ शोधणे त्रासदायक होईल. विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींची काळजी असल्यास शासनाने विद्यार्थ्यांना थेट वह्याच मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्याव्यात, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊ गावंडे यांनी व्यक्त केले.

पुनर्वापर अशक्य

प्रचलित पाठय़पुस्तकांचा पुनर्वापर केला जातो. वापरलेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. पाठय़पुस्तकात कोरी पाने जोडल्यावर त्या पानांवर विद्यार्थ्यांकडून लेखन केले जाणार असल्याने या पुस्तकांचा पुनर्वापर करता येणार नाही. त्यामुळे पुस्तकांची हजारो टन रद्दी निर्माण होईल. नवी पुस्तके दरवर्षी छापण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कागदवापरावा लागणार असल्याने पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होईल, असेही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने