अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ऋतुराज सिंह यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी ऋतुराज सिंह यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने ऋतुराज यांचे निधन झाले. स्वादुपिंडाशी संबंधित समस्या देखील ऋतुराज सिंह यांना जाणवत होत्या.

ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर आता त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ताजा खबरें