आता झाडांना सुद्धा मिळणार पेन्शन, ‘या’ राज्याने सुरू केली ‘ही’ अनोखी स्कीम

हरियाणामध्ये आता झाडांना पेन्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सरकारने प्राणवायू देवता योजनेची सुरूवात केली आहे. या योजनेची सुरूवात लहान आणि भूमिहिन शेतकऱ्यांच्या रोजगार वाढवण्यासाठी केलेली आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकार राज्यात पर्यावरण वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याने वाढत्या प्रदूषणावर लगाम बसेल. विशेष गोष्ट म्हणजे प्राणवायू देवता स्कीम अंतर्गत 75 वर्षाहून अधिक जुन्या वृक्षांना पेन्शनच्या रूपात वर्षातून एकदा 2500 रूपये देण्यात येणार आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी पैशांअभावी आपली जुनी झाडे विकू नयेत म्हणून जुनी झाडे वाचवण्यासाठी राज्यात ही योजना सुरू करण्यात आल्याचे वनमंत्री चौधरी कंवर पाल यांनी सांगितले, त्याचबरोबर लहान शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.या योजनेचे देशभरात कौतुक होत आहे. आतापर्यंत 3 हजार 300 हून अधिक झाडांची पेन्शनसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मते, शेतकरी आपल्या जुन्या झाडांसाठी पेन्शन योजनेसाठी अर्ज करतील, तशी त्यांची संख्या वाढेल. त्याच्यावर विश्वास ठेवला तर राज्यात 75 वर्षांहून अधिक जुन्या झाडांची संख्या 4 हजारांपर्यंत पोहोचू शकते.

जर हरियाणामध्ये कोणत्या शेतकऱ्याकडे 75हून अधिक जुनी झाडे आहेत. तर ते प्राणवायु देवता स्कीमच्या अंतर्गत या पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. जर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वनविभागाच्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊ शकतात. एक समिती त्या निवदेनाचे मुल्यांकन करेल. निवेदनाची सत्यता तपासून वृक्षांची पेन्शन सुरू करण्यात येईल. हरियाणा सरकार पर्यावरणाबाबत सतर्क झाले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट भाताची पेरणी करावी, असे आवाहन करत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना एकरी चार हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर हरियाणा सरकार राज्यात वृक्षारोपण कार्यक्रमही राबवत आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोफत रोपे दिली जात आहेत

ताजा खबरें