लाल सिंग चढ्ढा या चित्रपटानंतर आमीर खान आता एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका तो साकारू शकतो, अशी माहिती मिळत आहे.
1993 बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या, 26-11 दहशतवादी हल्ला, शक्तीमिल बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या अशा विविध प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कामगिरी बजावणारे म्हणून उज्ज्वल निकम यांची ख्याती आहे. दिनेश विजन या दिग्दर्शकाला उज्ज्वल निकम यांच्यावर चरित्रपट करायचा होता. त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दिनेश विजन यांनी कलाकारांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांच्यासमोर आमीरचं नाव आलं. आमीर या भूमिकेसाठी योग्य असल्याचं मत विजन यांनी पिंकविलाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याखेरीज आमीर पाच चित्रपटांच्या रिमेकची निर्मिती करणार आहे. द चॅम्पियन्स, जय जय जय हे, प्रीतम प्यारे, लापता लेडीज आणि लव्ह टुडे या चित्रपटांचा समावेश आहे.