तुमच्याही राज्यात पसरलाय का H3N2 विषाणू ? जाणून घ्या कोणाला याचा सर्वाधिक धोका; केंद्राचं काय म्हणणं आहे ?

भारतामध्ये कोरोनाची दहशत कमी होऊन लोकं सुखाने श्वास घेत असतानाच आता H3N2 (इन्फ्लूएंझा) विषाणूने हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे.

देशभरात या व्हायरसची (virus) लागण झालेल्यांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कर्नाटक व हरियाणा येथे या आजाराचे रुग्ण आढळले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने या व्हायरसबाबत निवेदन जारी केले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry)दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 9 मार्चपर्यंत इन्फ्लूएंझा विषाणूच्या विविध प्रकारांची एकूण 3038 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी जानेवारीमध्ये 1245 आणि फेब्रुवारीमध्ये 1307 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय मार्चमध्ये 486 प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये H3N2 प्रकरणांचाही समावेश आहे.

त्याच वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यांना सतर्क राहण्यासाठी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना मनसुख मांडविया म्हणाले की, भारत सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य उपायांमध्ये वाढ करण्यासाठी राज्यांसोबत काम करत आहे.

दरम्यान, H3N2 बद्दल सरकारने काय माहिती दिली ती जाणून घेऊया –

1) इन्फ्लूएंझाच्या विषाणूमुळे होणारे हे सीझनल इन्फ्लूएंझा रेस्पिरेटरी इन्फेक्शन (श्वसन संसर्ग) आहे. जगातील सर्व भागांवर याचा प्रभाव पडतो.

2) भारतात हंगामी इन्फ्लूएंझाचे दोन टप्पे असतात, पहिली जानेवारी ते मार्च आणि दुसरा टप्पा मान्सूननंतर सुरू होतो. याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धांना बसतो, जे इतर आजारांनी ग्रासलेले असतात.

3) सध्या सुरू असलेल्या हंगामी इन्फ्लूएंझाच्या रुग्णांची संख्या मार्चपासून कमी होण्यास सुरुवात होईल. H3N2 इन्फ्लूएंझा बद्दल सांगताना, कर्नाटक आणि हरियाणा या दोन्ही राज्यांनी प्रत्येकी एका मृत्यूची पुष्टी केली आहे.

4) आतापर्यंत, इन्फ्लूएंझा A (H1N1pdm09), इन्फ्लूएंझा A (H3N2) आणि इन्फ्लूएंझा बी (व्हिक्टोरिया) भारतात आढळून आले आहेत. आतापर्यंत इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांपैकी H3N2 इन्फ्लूएंझा हा मुख्य असल्याचे आढळले.

5) दर इतर इन्फ्लूएंझा प्रकारांपेक्षा H3N2 ग्रस्त रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा दर जास्त आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) ने Oseltamivir या औषधाची शिफारस केली आहे.

6) ज्यांना H3N2 ची लागण झाली आहे, त्यापैकी 10 टक्के लोकांना गंभीर रेस्पिरेचरी इन्फ्लूएंझा आहे आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तर 7 टक्के लोकांना आयसीयूची आवश्यकता आहे.

दरम्यान डॉक्टरांच्या सांगण्यावनुसार, H3N2 संक्रमित रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारखी लक्षणं जाणवतात. यावेळी फ्लू असलेल्या रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत आहे. याचं संक्रमण वेगाने होत असल्याचं दिसून आलं आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं