राज्याच्या बजेटमध्ये महिलांना काय मिळालं,जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट आज विधानसभेत सादर केले. अर्थसंकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं बजेट सादर केले. यावेळी बजेट सादर करताना महिलांसाठी विशेष योजना जाहिर केल्या. राज्याच्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये रुपये देण्यात येणार आहे. तर मुलगी सज्ञान झाल्यानंतर मुलीला रोख 75 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.

बजेटमध्ये महिलांना काय केली तरतूद
अंगणवाडी सेविकांची 20 हजार पदे भरणार
मुंबईमध्ये बचतगटांसाठी युनिटी मॉल सुरु करणार
अंगणवाड्यामार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखली व्यवस्थापन प्रणाली
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
पीडित महिलांसाठी 50 शक्तीसदन सुरु करणार

‘लेक लाडकी’ योजनेचे स्वरूप
मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत
मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये दिले जातील
सहावीत गेल्यानंतर तिला 6000 रुपये
तर अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येणार आहे
मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत
चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

jalgaonsandesh

jalgaonsandesh