ममुराबाद ग्रामपंचायत उपसरपंच पदी अनिस पटेल यांची निवड

जळगाव-: तालुक्यातील ममुराबाद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष कोळी यांचा उपसरपंच पदाचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नविन उपसरपंच पदी श्री अनिस पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त कि आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालया मध्ये बैठक घेण्यात आली. त्या बैठकिमध्ये सरपंच हेमंत चौधरी यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य श्री अनिस पटेल यांची उपसरपंच पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच श्री हेमंत चौधरी, ग्रा पं सदस्य शैलेंद्र पाटील, अमर पाटील, सौ लता तिवारी, विलास सोनवणे, सौ अंजना शिंदे, संतोष कोळी, सौ आरती पाटील, सौ प्रितम पाटील, एजाज पटेल, सुनिता चौधरी, गोपाळकृष्ण मोरे, सौ रंजना ढाके, सौ साधना चौधरी,ग्राम विकास अधिकारी श्री कैलास दिसले, महेश चौधरी, सचिन पाटील, नासिर शेख, भरत शिंदे, कर्मचारी ज्ञानेश्वर सावळे, बुधा सोनवणे, राजरत्न साळुंके, यश गोसावी, दिलीप सावळे, महेश अत्तरदे, इत्यादी उपस्थीत होते