जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममुराबाद ता .जि. जळगाव येथील इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश.

ममुराबाद-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममुराबाद ता .जि. जळगाव येथील इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश.
जि .प. शाळा ममुराबाद ता. जि. जळगाव येथील मागील वर्षी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये उत्तुंग यश मिळवले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. त्यांचे यशाबद्दल शिक्षण विभागाकडून विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.
गुणवत्ता यादीतील (मेरिट) विद्यार्थी

खालील प्रमाणे                                                              1) नंदिनी विजय पाटील रँक 11
2) पुनम प्रकाश कुंभार रँक14
3) विशाखा बुधा सोनवणे रँक51
4) आलिया अकिल पटेल रँक 99
5) उमंग सुनील कोळी 330                                              या यशाबद्दल गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी यांचा शिक्षण परिषदेत सत्कार करण्यात आला.