रावेर- दिनांक 13/1/2023 रोजी या स्पर्धेचा अंतीम सामना इकरा बॉईज vs पठाणभाई या टीम मध्ये खेळण्यात आला 8 ओव्हरच्या सामन्यात इकरा बॉईज या टीमने 150 रन काढत पठाणभाई या टीमला आव्हान दिले होते.चुरशीच्या या मुकाबल्यात पठाणभाई या टीमने दोन चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला.या स्पर्धेत रावेर यावल मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यातील गावातील एकुण 68 संघांनी सहभाग घेतला होता. संघास 11000/रु चे प्रथम पारितोषिक युवानेते धनंजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते पठाणभाई संघाचे कप्तान अख्तरभाई यांनी स्वीकारले.द्वितीय आलेल्या संघाला 5001/पारितोषिक देण्यात आले यावेळी श्री धनंजयभाऊ चौधरी,राष्ट्रवादी युवक जिल्हाकार्यध्यक्ष,मा.प स सदस्य श्री दिपक पाटील,निभोरा नगरीचे सरपंच श्री सचिन महाले,ओबीसी सेल ता.अध्यक्ष श्री सुनील कोंडे, श्री ललीत कोळंबे, ग्रा प सदस्य श्री मधुकर बिऱ्हाडे ,श्री स्वप्नील गिरडे,दस्तगीरभाई खाटीक, कांग्रेस चे उपाध्यक्ष युनुस अमन खान ,पटेल मेजर , चंद्रकांत चौधरी, नितीन महाले,अकाश बोरसे.
