गुलाबराव पाटील मंत्री कि मांत्रिक?

जळगाव-:बाळासाहेब ठाकरे आमचे बापाच्या जागी आहेत.हम बाप नही बदल सकते.काय राव! दोनच दिवसात बदलून मोकळे झाले.पळाले गुवाहाटी.ठाकरेंसोबत असतांना बाळ ठाकरे,उद्धव ठाकरे यांची आरती करणारे अचानक कसे काय बदलले? आत बदलणे,जात बदलणे, शब्द बदलणे, पक्ष बदलणे,बाप बदलणे खूप सोपे करून टाकले.हाड्या घाला कारभारी आणि गु लई ग्या दरबारी.अशी म्हण आन्देशी भाषेत प्रचूर आहे.मंत्री पद थट्टेचा विषय करून टाकला.

कालच जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली.यांनी का बोलवले?तेच कळत नाही.पण आले.काय काय बोलले?काय काय आश्वासन दिले? काय काय शुभेच्छा दिल्या? ऐकून वाटते कि मंत्री बोलले कि मांत्रिक ?काय गुलाबराव? तुम्ही मंत्री आहात कि मांत्रिक? काहीतरी बोलून, करमणूक करून वेळ मारून नेली.अहो, गुलाबराव,एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत.ते दाणापाणी च्या समस्येत आहेत आणि तुम्ही मारे खाऊन पिऊन त्यांच्या पूढे भाषणे ठोकतात.उपदेशाची.तुम्ही खाऊन पिऊन धट्ट होऊन बिचाऱ्या अर्धपोटी कामगारांना कोणता आशिर्वाद देतात?कोणता उपदेश करतात?असे भुकेल्या पोटी कोणते तत्वज्ञान ऐकायला लावतात? मंत्री आहात.सरकार मधे बसले आहात.तर सभामंडपातूनच मुख्यमंत्री शिंदेंना फोन लावा.” शिंदे साहेब, तुम्ही म्हणता पैसा कमी पडू दिला जाणार नाही.आणि इकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार बंद.चुला बंद.डोस्क बंद.शाळा बंद.दवाखाना बंद.हे ठिक नाही.तुम्ही काळ्या चोराचे घर फोडा पण आत्ताच यांचे पगार देण्याचे आदेश करा.शिंदेसाहेब, माझ्या अवतीभोवती पोलिस आहेत नाहीतर,हे भुकेले लोक जोड्याने मारतील.”

ठाकरे मुख्यमंत्री असतांना याच एसटी कामगारांनी सहा महिने संप केला.आणि हेच गुलाबराव पाटील तेंव्हा कैबीनेट मंत्री होते.ठाकरेंचे जवळचे होते.एकाच तागेतून झगा शिवत होते.दोघांचा रंग एकच.भगवा.म्हणजे त्याग,दया,धर्म.एकाच करंडातून कुंकू लावत होते.तर मग, ठाकरेंनी इतके ऐकले नसते का? ” ठाकरे साहेब, तुम्ही बगल वर करून खूप इकडची तिकडची ठोकतात.पण आपल्या मंत्रालयाजवळच एसटी कामगार भुकेले बसले आहेत.जे काही द्यायचे ते द्या किंवा नका देऊ.पण यांना एक वेळ भेट तर द्या.तितकी तर माणुसकी दाखवा.”

जर ठाकरेंनी तरीही ऐकले नसते तर गुलाबराव पाटील स्वतः तरी संपकऱ्यांना जाऊ भेटले असते.” मित्रांनो,कोणी तुमच्या सोबत असो नसो ,पण हा गुलाबराव तुमच्या सोबत आहे.कोणी नाही ऐकले तरी मी आहे तुमचे ऐकणारा.मी गरीबाचे लेकरू आहे.मी गरीबी पाहिली आहे.अनुभवली आहे.भुक काय असते,मला जाणवली आहे.तुम्ही इतके दिवस येथे भुकेले बसले आहात.मला खूप वाईट वाटते.साला माणूस, सत्तेवर आला कि माणसांना जनावर समजतो.पण मी तसा नाही.मला सहन होत नाही,यार हे! च्या आयला, मंत्री पद गेले तेल लावत.मी येथेच बसतो.तुमच्यासोबत.दखी लिसू,जे हुईन ते!”

पण ही माणूसकी गुलाबराव पाटील तुम्ही दाखवली नाही.शिंदेंनी काय कुल्फी दाखवली,ढुंकणाला पाय लावत पळाले, गुवाहाटी.ते भी ,अम्ब्युलन्स मधून.ही तर कमालच केली.पण ही कमाल पळपुटी होती.बहादुरीची नव्हती.बहादुरी ती होती,जर तुम्ही कामगारांसाठी सरकार विरोधात दंड ठोकून बंड केले असते.मग आम्ही जळगाव च्या लोकांनी म्हटले असते.” जळगावची मैदानी तोफ आहे.” पण तुम्ही तर कलाकार निघाले.वारा पाहून उपणतात.कधीतरी मंत्री सारखे वागा.कलाकार सारखे काय वागता?

मी आपणास समक्ष भेटून सांगितले कि,” भाऊ तुम्ही आता आमदार आहात.आमदार सारखे वागा.नंतर मंत्री बनले.तर घरी येऊन सांगितलं कि,आता मंत्री सारखे वागा.दिलेल्या शब्दाला जागा.कमीशन घेणे तुमचा हक्क आहे पण कधीतरी काही न घेता ही कामे करा.भ्रष्टाचार करणे तुमचा अधिकार आहे.पण अति झाले तर थांबा.पुन्हा पुन्हा ठोकल्याने कल्हई उतरते.म्हणून जमेल तितकेच बोला.”

सांगतो ऐका!नाटक,तमाशा,जलसा,जादूगिरी,गारूडी ,साधूगिरी, भोंदूगिरी घडीघडी एकाच ठिकाणी चालत नाही.म्हणून इस तिस गाव गाव फिरावे लागते.पण नेत्याचे तसे नसते.खरे पटेल, तितकेच बोलावे लागते.निभी तितलच बोलाणं,पची तितलच खावाणं!

शिवराम पाटील ९२७०९६३१२२                                    महाराष्ट्र जागृत जनमंच

जळगाव.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला