जळगाव शहरातील खुंटलेला विकास !

जळगाव -:शहर तुमचे ,माझे आणि लुटारूंचे आहे.यात तुम्ही,मी अलिप्त राहिलो, म्हणून लुटारू महानगरपालिका व विधानसभेत जाऊन बसले.तेथे पाठविल्यावर मी, तुम्ही कोणीही पांच वर्षे हटवू शकत नाही.तोपर्यंत जळगाव लुटून शहराची दयनीय अवस्था करून टाकली.आता पुन्हा महानगरपालिका निवडणूक येऊन ठेपली आहे,म्हणून भाजपने प्रायोजित कार्यक्रम सुरू केले आहेत.कधी वारकरी हातात घेऊन,कधी वंजारा समाजाला फुंकर घालून तर कधी एनजीओंना आर्थिक पाठबळ देऊन.

महानगरपालिका आणि विधानसभेची जय्यत तयारी चालू आहे‌.चांगला उपक्रम आहे.जो पुढे जातो,त्याला जाऊ द्यावे.आम्ही आयोजक,प्रायोजकांचे कौतुक करतो.हाच कार्यक्रम पक्षाचे बैनर लावून केला असता तर पक्षीय राजकारणाचा गंध आला असता.त्यामुळे आमदाराची,नगरसेवकांची चीड आलेले शिक्षित, उच्चशिक्षित नागरिक, व्यापारी, उद्योजक आले नसते.म्हणून जळगाव फर्स्ट हे चांगले व्यासपीठ निवडले आहे. डॉ राधेश्याम चौधरी व श्री दिलीप तिवारी यांचे आभार तर मानलेच पाहिजे.

जळगाव शहराचा विकास करण्याची जबाबदारी महानगरपालिका आणि शहरासाठी स्वतंत्र आमदार सुरेश भोळे यांची होती आणि आहे.ते तितके सक्षम नसल्याने ,त्यांचे वेगळेच उद्योग असल्याने ते निवडणूक पुरते लक्ष घालतात.पैशांच्या जोरावर ते जिंकतात.येथे दोन लाख मतदार पांचशेच्या दराने मत विकतात.त्यामुळे दहा कोटी खर्च करुन येथे दाऊद इब्राहिम सुद्धा निवडून येऊ शकतो.म्हणून त्यांनी काम केले अथवा न केले तरी जळगाव चे गरीब श्रीमंत, अशिक्षित व उच्चशिक्षित नागरिक माफ करतात. त्यांना कोणीही अधिकारी, कर्मचारी, सिपाई जुमानत नाहीत.अशी त्यांची तक्रार खरी आहे.आधिकारी आणि कर्मचारी काय करतात,काय करायला पाहिजे,हेच आमदाराला माहिती नसेल तर ऐकून तरी काय करणार? सुरेश भोळेंना आमदाराची वैधानिक शक्तीचे भान नाही किंवा तेच चाचपून असतील,तर कशाला कोण ऐकणार?तेथे पाहिजे गंभीर आणि खंबीर आमदार,ज्याला पाहून अधिकारी लटलट करतील.अमळनेरचे आमदार साथी गुलाबराव पाटील कलेक्टर ला विचारून आंत जात नसत.दरवाजा पायाने ढकलून आत शिरत.जसे पोलिस चोराच्या घरावर धाड टाकतात.असे न सांगता,न कळवता, परवानगी न घेता आमदार आत शिरत असेल तर कलेक्टर, सीईओ काळे गोरे करायला सात वेळा विचार करतीलच.

जळगाव महापालिका किंवा आमदार असे कोणाही पापी चे नांव न घेता कालचा कार्यक्रम झाला.बोला पण मोघम बोला.कोणाची जबाबदारी आहे,कोणाची बदमाषी आहे,असे न बोलता आयोजक,प्रायोजकांनी दक्षता घेतली होती.

सपन झुनझुनवाला म्हणाले कि, नगररचना विभागात बांधकाम मंजूरीच्या फाईली विनाकारण अडवून ठेवतात.हे अर्धसत्य आहे.फाईली अडवल्या जातात त्या तुमच्याकडून लांच येण्यासाठी. हे पुर्णसत्य आहे. ही लांच घेण्याची हिंमत शहर अभियंत्याची होणारच नाही, होतच नाही,तर महापौर,विरोधी पक्ष नेता आणि नगरसेवक यांच्या सहमतीने ते लांच घेतात.दस्तुरखुद एका नगरसेवकाच्या पुतण्याकडून अडीच लाखाची लांच घेतली,तरीही सारे कसे शांत शांत! सभागृहात ठेके मिळवण्यासाठी एकमेकांची गच्ची धरणारे नगरसेवक येथे सभ्य का? सबका हिस्सा बराबर है.बेईमानीके धंदेमे इमानदारी !

आमदाराला,नगरसेवकांना तुम्ही आपण निवडून देतो .पेपरचा वर्धापनदिन, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ ठिकाणी आग्रहाने बोलवून स्वागत, सत्कार करतो.त्यांच्या हातून वधूवरांना आशिर्वाद मिळवून घेतो,तुमच्यासारखाच लांचखोर ,हप्तेखोर संतान होऊ दे.आता इतके पाप सभ्य, सुसंस्कृत, उच्चशिक्षित लोकांकडून झाले तर दोष कोणाला देणार? जबाबदारी तर सभ्य, सुसंस्कृत, उच्चशिक्षित नागरिकांची आहेच.

जळगाव कोर्ट चौक ते गणेश कॉलनी पर्यंत रस्ता मागील दहा वर्षात बनवला नाही.डिसेंबर २०२०मधे वर्क ऑर्डर निघाली आहे.ती सुद्धा मोघम ३४कोटी ८५लाखाची . त्यातून कोणता रस्ता किती बनवायचा,हे नमूद नाही.कोणतेही टेक्निकल एक्झिबिशन बोर्ड लावले नाही.पण सुरेश भोळे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे यांची नांवे टाकली आहेत.ज्यांचा या निधीशी आणि कामाशी काहीही संबंध नाही.असे कोणीही कोणाचेही नांव लावले तर शाळेत पोरांना बापाचे नांव विचारण्याची गरज नाही.गुरूजींना जो समोर दिसला त्याचे नाव बाप म्हणून टाकता येईल.

हा बोर्ड कोर्टाच्या कंपाऊंड वाल जवळ लावलेला आहे.तेथून रोजाना किमान एक लाख लोक ये जा करतात.१७ न्यायाधीश,६०वकील,४५ प्रोफेसर,२२ डॉक्टर, १५ इंजिनिअर,४५ पत्रकार ,१२ नगरसेवक .तरीही एकालाही ते खटकले नाही.कोणीही हटकले नाही.एक अल्पशिक्षित आमदार इतक्या उच्चशिक्षित लोकांना कशी काय भुरळ पाडू शकतो?यातच आमच्या शहराचा भकास दडलेला आहे. जळगांव महानगरपालिका सभेत चर्चा,संवाद,वाद, हाणामारी चालू आहे,कि यावर नको ती नांवे टाकली तर आमचे महापौर चे नांव का नाही? आमदारांनो, मंत्र्यांनो,तुम्ही जे धंदे करतात,तेच तर आम्ही करतो.

विकास कुठे खुंटला? विकास कोणी रखडला?विकासाचा निधी कोणी चोरला?हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.नागरिकांचे बोट आमदार व नगरसेवकांच्या नाकापर्यंत पोहचले पाहिजे.तरच याचे उत्तर मिळेल.जर तितकी हिंमत होत नसेल तर ,येत्या महानगरपालिका निवडणुकीत कोणताही नगरसेवक रिपीट करु नका.आमदाराला रिपीट करू नका.कितीही पैसे दिले तरीही.कितीही दारू पाजली तरीही. इतका साधा,सिम्पल,सोपा उपाय या भकास वर आहे.म्हणून तर दर पांच वर्षांनी निवडणूक घेणे अनिवार्य केले आहे.दोष सिस्टीमचा नाही.दोष कास्टींगचा आहे.जाणते हुए,होश हवाशमे लोग चोरोको चुनते है.

गिरीश महाजन आणि सुरेश भोळे यांना आधीच सांगितले कि, ५ कन्व्हिक्टेड क्रिमीनल नगरसेवकांचा राजीनामा घ्या.जे भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेत पळाले,त्यांचा नाद सोडा.दुख बाळगू नका.तु्म्ही गुंडांचे सिलेक्शन केले होते.आम्ही त्याच गुंडांचे इलेक्शन केले.म्हणूनच जळगाव चा विकास खुंटला आहे.

नागरिकांनो, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना (कौरव),शिवसेना (पांडव) हे जाणिवपूर्वक गुंड गुन्हेगारांचे सिलेक्शन करतीलच.पहिला प्रश्न विचारतील, तुम्ही किती कोटी खर्च करू शकता? केले तरी आपण त्यांचे इलेक्शन करू नका.तेथे मतदान करतांना कोणताही गुंड, गुन्हेगार,चाकू,सुरी, तलवार नसते.तुम्ही धनासक्त व भयग्रस्त असू नये.इतकीच दक्षता घेतली तरीही जळगाव बदलू शकते.तुम्ही तुमच्या उमेदवाराला ओळखत नाहीत,जाणत नाहीत,ही सबब खोटी आहे.

राज्यात ठाकरे असोत कि शिंदे!केंद्रात मोदी असोत कि मनमोहनसिंग! महानगरपालिका स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे.कर लावण्याचे, वसुलीचे अधिकार आहेत.उलट महानगरपालिका हद्दीतील महसूल, स्टॅम्प,जीएसटी चा हिस्सा महानगरपालिकेला मिळतोच.ती कोणाची मेहरबानी नाही.मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री च्या नरडीत हात घालून हिस्सा काढण्याची हिंमत महापौर मधे , आमदार मधे पाहिजे.त्यासाठी दया ,याचना,अर्ज ,फाटे करण्याची गरज नाही.असा प्रयोग दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी यशस्वी केलेला आहे. येड्यागबाळ्याचे काम नव्हे,तेथे पाहिजे जातीचे! आमच्याच करातून जळगाव चे सर्व रस्ते बनवले,गटारी बांधल्या, पाणीपुरवठा केला, दवाखाना चालवला,शाळा चालवल्या, दिवाबत्ती केली , साफसफाई केली तरीही पैसा उरणार आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला नियमित कामापेक्षा पंचवीस टक्के जास्त वसुलीतून उत्पन्न मिळते. फक्त चोरी नको.म्हणून चोर नगरसेवक नको.म्हणून चोर आमदार नको.इतकी खबरदारी मतदारांनी घेतली तरीही जळगाव चा विकास होऊ शकतो.

शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला