ममुराबाद येथील जि. प. शाळेत उद्या रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

ममुराबाद दि.३१ ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन उद्या दिनांक १ जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळेत नववर्षाची सुरुवात जर आपल्याकडून समाज कार्याने झाली तर संपूर्ण वर्षभर तो दिवस आपल्या निश्चितच स्मरणात राहील आणि वर्ष देखील आनंददायी जाईल यात शंका नाही.

नवीन वर्षाचा पहिला दिवस अर्थात दि. १/१/२०२३ रविवार रोजी जळगांव सत्यसाई सेवा समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममुराबाद आणि रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्त दान” शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

श्री सत्यसाई सेवा समिती,जळगाव, डॉ. प्राची हूंडीवाले, (एम.डी.एस.), डॉ.पद्ममेश ठाकरे (बी.डी.एस.) आणि डॉ. शुभांगी मालू (बी.डी.एस.) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ममुराबाद येथील इयत्ता १ ते ७ वी मधील सुमारे २८० विद्यार्थ्यां करिता मोफत दंत तपासणी शिबीराचे देखील आयोजन केलेले आहे.

सदरील शिबीरात दंत तपासणी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोलगेट पेस्ट व टूथ ब्रश आपल्या समितीकडून भेट स्वरुपात दिला जाणार असून त्यासाठी आपले योगदान अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त वैयक्तिक स्वरूपात जर कोणाला वेगळी ‘नारायण सेवा’ शिबीरात करावयाची असल्यास ते करू शकतात. तसेच समस्त ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना याद्वारे विनंती करण्यात येते की, आपण या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाज कार्याचे धनी व्हा!असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश मोरे यांनी केले आहे.

शिबीराचे ठिकाणी 

स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममुराबाद ता. जि. जळगांव

दिनांक : १/१/२०२३

वेळ : सकाळी १० ते २

jalgaonsandesh

jalgaonsandesh