ममुराबाद-: राजकीयदृष्ट्या संवेदनशील व १७ सदस्य संख्या असलेल्या ममुराबाद ग्रामपंचायतीच्या २८ नोव्हेंबर रोजीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी हजर न राहाता एकमुखी बहिष्कार टाकल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.
आज दिनांक २८ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायती मार्फत विकास कामे होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी मात्र गामसभेकडे पाठ फिरल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.
ग्रामविकास अधिकारी देसले यांचेकडे ममुराबाद ग्रामपंचायतीचा अतिरीक्त कारभार असल्याने ते ममुराबाद गावी आठवड्यातुन एक किंवा दोन दिवस येत असतात त्यामुळे ग्रामसेवकच गैरहजर असल्याने तक्रारी कोणाकडे मांडायच्या. ग्रामविकास अधिकारी आठवड्यातून एखादा दिवस येत असल्याने गावातील विकासकामांना खीळ बसली असून अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे आज रोजी होणार्या ग्रामसभेवर ग्रामस्थांनी हजर न राहुन एकप्रकारे बहिष्कार टाकल्याचे दिसुन आले.