संविधानाच्या प्रस्तावनेतून देशाची ओळख : जयसिंग वाघ

नाशिराबाद :- देशाचे संविधान हे मोठ्या ग्रंथरुपात असते , ते समजून घेणे क्लिष्ट असते , मात्र संपूर्ण संविधानाचा सार हा त्याच्या प्रस्तावनेतून आलेला असतो व तो फक्त एक पानाचा असतो व त्यातूनच संपूर्ण संविधानाची व देशाची ओळख होत असते , त्याच करीता प्रत्येक शाळेत प्रस्तावना वाचन होत असते असे विचार प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी 26 नोव्हेम्बर रोजी नाशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनीयर कॉलेज येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याता म्हणून भाषण करतांना व्यक्त केले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन माळी होते तर मुख्य अतिथि म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेन्द्र सालुंखे , सी बी अहिरे , प्रवीण महाजन , अतुल महाजन होते

जयसिंग वाघ यानी पुढं आपल्या भाषणात सांगितले की सामाजिक विषमता फ्रांस , अमेरिका , ब्रिटेन या देशांमध्ये सुद्धा होती पण त्या देशांच्या संविधानाने ती वेग वेगळ्या काळात घालवली मात्र भारतीय संविधानाने अगदी सुरवातीलाच इथली जातीयता , अस्पृश्यता , स्त्री पुरुष विषमता कायद्याने रद्द करुन टाकली , तेंव्हा सर्व जनतेने संविधाना विषयी स्वाभिमान बाळगला पाहिजे असेही वाघ यांनी स्पष्ट केले

कार्यक्रमाचे सूत्र संचालन बी आर खंडारे , प्रास्ताविक विनोद रंधे यांनी तर आभार प्रदर्शन तुषार रंधे यांनी केले

सुरवातीस डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन तसेच दीपप्रज्वलन मान्यवरांतर्फ करण्यात आले , मान्यवरांचे स्वागत सी बी अहिरे , शांताराम सोनवणे , रमेश रंधे , विनोद रंधे , बी आर खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले

कार्यक्रमास शिक्षक , पालक , विद्यार्थी मोठ्या संखेने हजर होते , या प्रसंगी संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले तसेच मुम्बई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनतेला श्रद्धानजली अर्पण करण्यात आली.