ममुराबादकरांना पाण्याची समस्या कायम; 4 दिवसांपासून पुरवठा ठप्प. सरपंचांनकडुन नागरीकाना उर्मटपणे उत्तर…..

ममुराबाद – : नदीला पाणी मुबलक प्रमाणात असतांना देखील मुमुराबादकरांना प्यायला पाणी नाही, अशी अवस्था केवळ ग्रामपंचायती च्या हलगर्जीपणा, व गलथान कारभारामुळे होत असल्याचे दिसत आहे. नदिवरील किंवा फिल्टर वरील पंप चार चार दिवसांनी जळतात तरी कसे ? असा प्रश्न गावातील नागरीकांना पडलेला आहे. याबाबत सरपंच हेमंत चोधरी यांना विचारणा केली असता त्यांच्या कडुन उर्मट व उद्धट पणे उत्तरे दिली जातात. आम्ही आमचे काम बरोबर करतो आहे. कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही. वर्षभराचा जर विचार केला तर सहा महिनेच पाणी नियमीत येते. मग पाणी पट्टीच्या करात वाढ कशी ? पाणी पट्टीचे दर का कमी करण्यात येत नाही. असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांचे कडे उत्तर नाही.

नांद्रा येथुन फिल्टर प्लॅनवरून पंप गायब

बऱ्याच वर्षापासुन नांद्रा गावावरून ममुराबादला पाणी पुरवठा केला जातो. पंप जळण्याची समस्या आजपर्यत् सुटलेली नाही. कारण आजपर्यन्त नांद्रा गावी जुने 4 सबमर्सिबल पंप तसेच ठेकेदाराने योजना पुर्ण झाल्यावर नविन घेतलेला 1 पंप. प्रशासकिय काळामध्ये प्रशासकाने घेतलेला 1 पंप असे एकुन 6 पंप जागेवर असायला हवे मात्र त्याठीकाणी 3 च पंप उपलब्ध आहे. मग बाकी पप कुठे गेले. असा प्रश्न गावातील नागरीकांना पडलेला आहे. जर जागेवर पंप मग कोणी चोरून नेले याचा तपासही लागणा गरजेचा आहे.बऱ्याच वेळेस सरपंच, सदस्य, पाणी पुरवठा कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांचेकडुन उडवा उडवीची उत्तरे त्यांचे कडुन नागरीकांना दिली जातात. पाण्याची समस्या लवकरात लवकर न सुटल्यास संबधीताविरोधात वरिष्ठांनकडे तक्रार करणार असल्याचे देखील नागरीकांनी सांगीतले.