कासव गतीने कामे करणारी ममुराबाद ग्रामपंचायत

महेंद्र सोनवणे
ममुराबाद-: ममुराबाद ग्रामपंचायातीची विकासाची कामे दिरंगाईने करण्यासंदर्भात वर्ड गिनीज बुकात नोंद करावी लागेल. ग्रामपचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधी तर्फे वचक नाही किंवा लोकप्रतिनिधींचे कोणी ऐकत देखील नाही.
त्यामुळे गावातील विकास कामे वर्षानुवर्षे रखडलेले दिसून येत आहेत. पाणीपुरवठा योजना असो, बंदिस्त गटार योजना असो, बराच कालावधी संपून झाला तरी अद्याप ती कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे गावातील रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. गावातील खराब रस्त्यांची तर आता चर्चाच होत नाही. प्रत्येक काम विलंबाने करणे हा जणू हातखंड म्हटला पाहिजे.
वार्ड क्रमाक ३ मधिल साईबाबा मंदिराजवळ असलेले घाणीचे साम्राज्य, गावातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मोठमोठे रस्त्याची कामे अद्यापावेतो झालेली नाही. गावातील रस्त्यांवर काँक्रिटीकरण, पेव्हर , करण्यात आले परंतु ज्या रस्त्यावर कामे करण्यात आली ती रस्त्याची कामे या अगोदर कुठल्यातरी योजनेत झालेली असताना देखील कमी खर्च लागावा या हेतूने त्याच रस्त्यांवर परत कामे करण्यात आली. गावाच्या बाहेरील असलेल्या रस्त्यांवर उदाहरणार्थ असोदा रस्ता,जळगाव रस्ता विदगाव रस्ता , नांद्रा रस्ता, कानळदा , या सर्व सर्व ठिकाणी अद्याप पथदिवे लागलेले नाहीत. पथदिव्यांचे पोल उभे दिसताहेत पण त्यांना दिवेच लागलेली नाहीत. प्रत्येक कामात दिरंगाई हे पाचवीला पुजलेले आहे. ममुराबाद मधिल मुस्लीम मस्जिद कडून उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण झाल्याने व शेजारीच रहिवास असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वार्ड क्रमांक चार कडुन येणारा शिंदे वाड्याकडील रस्ता तो सरळ विदगाव रस्त्याला भिडतो त्या रस्त्यावर सुद्धा जि प मराठी मुलांच्या शाळेत पाठीमागच्या भिंतीकडुन मोठ्या प्रमाणात घाण, व उकिरडे झाल्याने ति सर्व दुर्गंधी शाळेत येऊन मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
मागील काही काळात ग्रामपंचायतीने काहि कामे केली ती पण थातूरमातूरच.
बाहेर गावाहुन येणारे जाणारे लोक गावाची खिल्ली उडवतात परंतु लोकप्रतिनीधीना कोणत्याच गोष्टीची लाजदेखील वाटत नाही. या उलट लोकप्रतीनीधी हसुन मोकळे होतात व सांगतात कि आमचे ग्रामपंचायत मध्ये काहिच चालत नाही. ममुराबाद येथील नागरीक सोशिक आहेत. तथापि त्यांच्या सोशिकपणाला काही मर्यादा असताना त्यांचा बांध फुटण्याची वाट ग्रामपंचायतीने पाहू नये. जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांना दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्याची जबाबदारी सरपंचांनी नागरिकांचे सहकार्य घेऊन पार पाडावी.
पण तसे होताना दिसत नाही. गावातील रस्ते खराब आहेत, आणि हे रस्ते अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची नाही काय?
ग्रामविकास मंत्रालयाने १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातुन मोठ्या निधीची तरतुद केलेली असतांना व मोठ्या रकमेचा निधी ग्रामपंचायतीला मिळालेला असताना देखील तो निधी १५ वा वित्त आयोगाच्या बँक खात्यामध्ये पडून आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी यांनी अचानकपणे ममुराबाद गावात गुप्त फेरफटका मारावा, म्हणजे हा कारभार त्यांच्या लक्षात येईल.मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांचे अधिकारी यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्य केले, तरच गावातील नागरिकांना योग्य सोयी सुविधा मिळू शकतील. अन्यथा येरे माझ्या मागल्या चालू,,,,, राहील……