प्रधानमंत्री आवास योजनेच्या या लोकांचे घरकुल होणार रद्द,

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत गावोगावी लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो परंतु यामध्ये घरकुल योजनेसाठी काही नियम ठरविण्यात आले आहे ते नियम खालील प्रमाणे आहेत.

ज्यांच्याकडे खलील गोष्टी आहेत ते लोक घरकुल योजनेसाठी अपात्र आहेत.

1)ज्यांच्याकडे दोन / तीन / चार चाकी गाडी किंवा यांत्रिक मासेमारीची बोट आहे.

2)ज्यांच्याकडे यंत्रावर चालणारे तीन / चार चाकी शेती अवजारे आहेत.

3)ज्यांच्याकडे 50000 पेक्षा जास्त लिमिटचे किसान क्रेडिट कार्ड आहे.

4)ज्यांच्या कुटुंबात कुणीही एखादा व्यक्ती सरकारी नोकरीत आहे.

5)असे कुटुंब ज्यांच्याकडे सरकारी नोंदणीकृत बिगरकृषी उद्योग आहेत.

6)कुटुंबात 10000 पेक्षा जास्त कमवणारी व्यक्ती असेल.

7)Income Tax भरणारे कुटुंब

8)व्यवसायिक कर भरणारे कुटुंब

9)रेफ्रीजिरेटर असणारे कुटुंब

10)ज्यांच्याकडे लँडलाईन फोन आहे असे

11)2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती शेती असणारे कुटुंब

12)5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेत जमीन ज्यामधे दोन पेक्षा जास्त पिके घेतली जातात.

13)कमीत कमी 7.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीनीबरोबरच कमीत कमी एक सिंचनाचे साधन असलेले कुटुंब.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्व्हे करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

घरकुल ड यादीचा सर्व्हे करून प्रत्येक गावाच्या अंतिम घरकुल ड याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

घरकुल ड यादीचा सर्व्हे झाल्यावर त्या याद्यामधून प्राधान्यक्रमानुसार पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायतीकडून तयार करून शासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

आपल्या गावाची घरकुल यादी येथे पहा

https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx