बेलव्हाळ च्या जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू !

भुसावळ(सुनसगाव)वार्ताहर                          जळगाव – नशिराबाद दरम्यान महिंद्रा शो रुम जवळ झालेल्या मोटरसायकल अपघातातील जखमी युवकाची उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत माहिती अशी की दि ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास जळगाव – नशिराबाद रस्त्यावर महिंद्रा शो रुम जवळ दोन मोटरसायकल स्वारांचा अपघात घडला होता यात जळगाव येथून घरी बेलव्हाळ येथे येणारे संजय उर्फ लिलाधर जगन्नाथ भंगाळे ( वय ४५ ) हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते मात्र दि ५ रोजी संध्याकाळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर बेलव्हाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा , भाऊ , बहिण असा परिवार असून ते जळगाव येथील हाॅटेल मानस चे संचालक जितेंद्र भंगाळे यांचे भाऊ होते .संजय भंगाळे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh