झुरखेडा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारकडे डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष 

धरणगाव :- तालुक्यातील झुरखेडा गावातील ग्रामपंचायतचे गावातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे त्यात गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे या कारभाराच्या तक्रारी करून देखील त्यांचेही दुर्लक्ष पाहायला मिळत आहे

सणासुदीच्या काळात गावात स्ट्रीट लाईट गेल्या दोन दिवसांपासून लाईटबिल न भरल्यामुळे बंद आहे तर ही चुकी कोणाची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे गावात काही दिवसांपूर्वी चोऱ्यांचे प्रमाण वाढलं होत आता त्यात अजून ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे  दिवाळी तोंडावर असतांना गावातील स्ट्रीट लाईट बंद झाली आहे तरी गावातील रविंद्र निळे ग्रामसेवक, प्रभारी सरपंच, सदस्य यांनी मात्र दुर्लक्ष केल्यामुळे गावात मात्र अंधेरा कायम रहेगा असे झाले आहे अश्यामुळे गावात चोऱ्या होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि असे झाल्यास त्याला जवाबदार कोण असे गावातील नागरिकांना प्रश्न पडला आहे.

सविस्तर असे की, गावातील सुरेशआप्पा पवार (पाटील) सामाजिक कार्यकर्ते यांनी झुरखेडा ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी धरणगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचेकडे गेल्या एक वर्षापासून तक्रारी करीत आहेत त्या तक्रारीत त्यांनी १४ वा वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीचा वापर कुठे करण्यात आला, गावात केलेल्या कोक्रेटिकरणचे अंदाजपत्रक नुसार न काम, दलित वस्तीत झालेल्या कोक्रेटिकरणाचे कागदपत्र व हिशोब, लेखापरीक्षण अहवाल, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात किती शौचालय बसविण्यात आले, एल इ डी कधी कधी घेण्यात आहे त्यासाठी किती खर्च झाला, शिक्षण व महिला बालकल्याण अंतर्गत करण्यात आलेला खर्च ,अपंग व्यक्तीसाठी किती खर्च करण्यात आला गावातील दलित वस्ती व दुसखेडा गावातील आदिवासी समाजासाठी कोणकोणत्या उपाय योजना करण्यात आल्या अश्या विविध समस्यांवर वारंवार तक्रार करून देखील या संपूर्ण कारभाराच्या चौकशी साठी मागणी केली आहे तरी देखील ग्रामसेवक, गटविकास अधिकारी,  डॉ पंकज अशिया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मात्र झुरखेडा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करत हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी अवस्था आहे.                        यामुळेच सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी ग्रामविकास चे अवर सचिव यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यानंतर ग्रामविकास विभागाकडून देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना झुरखेडा ग्रामपंचायत च्या चौकशी साठी पत्र पाठविण्यात आले मात्र त्यांनी कोणतेही लेखी उत्तर न दिल्यामुळे त्यांना परत ग्रामविकास विभाग बांधकाम भवन मंत्रालय, मुंबई यांचेकडून  दि. ०३/१०/२०२२ रोजी स्मरणपत्र-१ पाठविण्यात आले तरी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव यांनी देखील ग्रामविकास विभागाला केराची टोपली दाखवत आपला मनमानी कारभार चालवला आहे

त्यामुळे अश्या झुरखेडा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव यांचे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांनी  नेमकी दाद तरी कोणाकडे मागावी   त्यामुळे आता नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या चुकीच्या कामामुळे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. की हे सर्व कर्मचारी अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत .