तांदलवाडी येथील तरुणांनी पकडला अवैध गोवंश वाहून नेणारा ट्रक 

मुंजलवाडी प्रतिनिधी चंद्रकांत वैदकर                तांदलवाडी – :मध्यप्रदेशातून येणारा तांदलवाडी जवळून मस्कावद सुनोदा मार्गे मांगलवाडी फाटयावरून हतनूर वरणगाव कडे जाणारा गुरे अपुऱ्या जागेत कोंबून कत्तल करीता वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला गेला.

मध्य प्रदेशातून गुरे कोंबून वाहतूक करणारा ट्रक क्र. एम पी. १३ सी ए ९९५० व एम.पी.४१ जी ए. २५५८ या दोन नंबर असलेली आयशर ट्रक सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील युवकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यास यश आले.सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अवैध गुरे वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक मांगलवाडी सुनोदा फाटयावर अचानक बंद पडला.यावेळी येथील काही युवक हे व्यायाम करण्यासाठी जात असता त्यांना या ट्रकमध्ये मेलेल्या गुरांचा वास आल्याने त्यांना संशय आल्याने ट्रक चालकासह तिघांना हटकले असता त्या तिघांनी ट्रक तेथेच सोडून पलायन केले. प्रकरणी चालकासह तीन आरोपी पसार झाले आहेत.पसार आरोपीच्या शोधात रात्री उशिरापर्यंत पोलिस होते.यावेळी रावेर पो.निरिक्षक शितलकुमार नाईक,फैजपूर पो.स्टे. चे सिध्देश्वर आखेगावकर,निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पो.नि.काशिनाथ कोळंबे तसेच सावदा राखीव दल कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळली व जमावाला शांत केले.यावेळी ट्रकमध्ये ५० च्या आसपास गुरे असावेत त्यातील मयत २४ गुरे रस्त्याच्या कडेला जेसीबी ने गडडा करून पुरण्यात आले.तर जीवंत गुरांवर डॉ.निलेश राजपूत,डॉ.नेमाडे,डॉ.रविंद्र भोगे,डॉ.कडू तायडे,डॉ.प्रकाश तायडे,डॉ प्रकाश पाटील,यांसह आठ ते नऊ डॉक्टरांची टिम उपचारासाठी दाखल झाली होती. यातील जिवंत गुरांना परिसरातील ग्रामस्थ गुरांची परिस्थिती पाहून संवर्धनासाठी घेवून गेल्याचे समजते.पळून

घटनेच्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याचे टॅंकर ग्रा.पं सदस्य शशांक पाटील,जेसीबी किशोर चौधरी यांनी उपलब्ध करून दिले.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष महाजन,श्रीकांत महाजन,यांचेसह ग्रामस्थांचे सहकार्यने व बजरंग दल जिल्हा संयोजक विकि भिडे, जिल्हा दीपक सुरळकर उदली,रमेश नमायते तांदलवाडी व असंख्य तरुणांनी गाडीतुन गुरे उतरवण्यास मदत केली.