ऐनपुर येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

मुंजलवाडी प्रतिनिधी:- चंद्रकांत वैदकर

रावेर –तालुक्यातील ऐनपुर गावातील एका 40 वर्षीय व्यक्तीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना .

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि . 17 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी नितीन मधुकर पाटील वय 40 याने व सहकारी महिला वय 30 यांनी संगनमत करून पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी नितीन पाटील यांचे ऐनपूर शिवारातील शेतात काड्या वेचण्याच्या उद्देशाने महिला आरोपीने बोलावून आरोपी नितीन पाटील यांनी आश्लील बोलून सदर पीडित बालिकेवर जबरदस्तीने अत्याचार केला याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोघा आरोपी विरुद्ध भाग 5 गु.र.नं .170/22भादवि कलम 376 तसेचबालकांचे लैंगिक अत्याचार कायदा अधिनियम कलम4,6तसेच अनु. जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे तपास करीत व निभोंरा पोलीस स.पो.नि.गणेश धुमाळ करीत आहेत.