जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद येथे १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या कथीत घोटाळ्या बाबत सरपंच त्याच प्रमाणे ग्रामसेवक यांनी जवळपास अठरा ते एकोनाविस लाखाचा घोटाळा केल्या बाबत ग्रामपंचाय सदस्या प्रितम पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. सदरच्या घोटाळ्या संबधी तक्रारीमुळे गावात एकच चर्चा सुरु झाली आहे. ते म्हणजे ” आ बैल मुझे मार”
गावातील या कथीत घोटाळ्यामुळे नागरीकांना एकच प्रश्न पडला आहे कि यामध्ये दोषी कोण ? जर सरपंच ग्रामसेवक दोषी असतील तर सदस्यांचे काय ? मागिल महिन्यात मासिक सभा झाली त्या सभेमध्ये मागील झालेल्या खर्चाचे वाचन करण्यात आले. ज्या सभेत खर्च वाचन करूण सर्वानुमते मंजुर करण्यात आला त्या सभेला प्रोसिंडीग बुका मध्ये सतरापैकी सोळा सदस्यांची हजेरी होती व त्यावर सर्व सोळा सदस्यांनी सह्या देखील केल्या आहेत.
याचाच अर्थ असा आहे कि 14 वा वित्त आयोगाच्या घोटाळ्यामध्ये सोळा सदस्यांचा देखील सहभाग आहेच. याबाबत गावातील नागरीकांनमध्ये एकच चर्चा सुरु आहे ति अशी कि घोटाळ्याची रक्कम सर्वांनी मिळुन वाटणी करावयाची होती परंतु सभेला महिना उलटला तरी सदस्यांना मिळणारा हिस्सा त्यांच्या पर्यन्त न पोहोचल्याने सदर घोटाळ्याबाबत सदस्यच तक्रार करायला लागल्याने हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या विषयाबाबत गावातील प्रत्येक चौका चौकात एकच चर्चा सुरु आहे, ति म्हणजे “आ बैल मुझे मार “