ममुराबाद -:वार्ड क्र. 4 मधील दलितवस्ती परिसरातील रहिवासी यांच्या आरोग्यास ग्राम पंचायतीच्या अनेक चुकांमुळे धोका निर्माण झालेला आहे.
https://youtu.be/o2b4oMqTK2Q
याबाबत सविस्तर वृत्त असे की ममुराबाद येथील वार्ड क्रं 4 हा इतर 5 वार्डाच्या तुलनेत खुप मोठा आहे. तरीही ग्रामपंचायत-प्रशासन वार्ड क्रं. 4 वरती सातत्याने दुर्लक्ष करुनच आहे.वार्ड क्रमांक 4 मध्ये दलित सुधार निधीमधून गटार बांधण्यात आली परंतु बांधण्यात आलेली गटार जमिनीपासून दीड फूट उंचावर असल्यामुळे बांधण्यात आलेल्या गटारीच्या परिसरामधील नागरिकांचे घरातील पाणी अक्षरशः रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात डबके साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.दलित वस्ती मध्ये असलेल्या बौद्ध विहारा समोरकारण दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचे मोठे डबके साचल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दलित वस्ती सुधार निधी मधून झालेल्या बंदिस्त गटारीवर एकही फरशी उरलेली नाही त्यामुळे तेथून चालत येणाऱ्या नागरिकांना गटारीवरून कसरत करून रस्ता ओलांडावा लागत असल्याने सदर गटारीच्या झालेल्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील येथील नागरिकांकडून केली जात आह.

परिसरातील नागरिकांनी याबाबत बऱ्याच वेळेस सरपंच ग्रामसेवक यांना सदरील विषयाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे आजपर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सदर विषयाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला होत असलेल्या त्रासापासुन मुक्त करावे.