नांद्रा येथील ग्रामीण पेयजल योजनेत झालेल्या अपहारा प्रकरणातील दोषींनवर कायदेशीर कारवाई न झाल्यास करणार उपोषण,वीर जवान देश सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा इशारा,,,,

महेंद्र सोनवणे

पाचोरा – : नांद्रा गावी काहि वर्षा पूर्वी राबविण्यात आलेल्या पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झालेला असल्याने योजनेचे काम आजही प्रलंबीत असल्याने येथील नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

योजनेबाबत गावातील अनेक नागरीकांनी वेळोवेळी सदर अपहाराबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी करूण देखील वरिष्ठांन कडुन सदर प्रकरणाची दखल घेतली जात नसल्याने नागरीकांचा प्रशासना वरिल विश्वास उडालेला दिसत आहे.

सदर प्रकरणाबाबत कार्यकारी अभियंता जळगाव यांना तक्रारकर्त्यानी विचारणा केली असता गावी झालेल्या योजनेत अपहाराच्या रकमेची वसुली संबंधीतांन कडुन  करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.पेयजल योजनेत अपहार झालेला असेल तर संबधीत दोषींनवर आजपर्यन्त कायदेशीर कारवाई का झाली नाही. ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे.

पेयजल योजनेत अपहाराच्या प्रकरणामध्ये वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा वाटा.

नांद्रा ता.पाचोरा येथील पेयजल योजनेच्या कामाची ग्रामीण पुरवठा अधिकारी जि.प.जळगांव यांच्याकडून चौकशी होऊन सुध्दा संबंधीत दोषींवर अद्याप पावेतो दंडात्मक कार्यवाही झाली नाही.

त्यामुळे प्रशासनाचे काहि अधिकारी, कर्मचारी यांचा सुद्धा अपहाराच्या रक्कमेत मोठा वाटा असल्याचे ही येथील ग्रामस्थांच्या वतीने बोलले जात आहे.

सदर विषया बाबत दि. २७/०५/२०२२ रोजी चौकशी करण्यात आली. त्यावेळी नविन बांधलेल्या जलकुंभाची मोजमाप केली असता ती प्रत्यक्षात ५७६०० लिटर पाणी मावेल एवढीच बांधलेली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र १२५,००० लिटरची मंजुरी असतांना ५७,६०० लिटरचीच का बांधण्यात आली? तसेच ५ कि.मीटरची पाईप लाईन सुध्दा तांत्रीकदृष्ट्या योग्यपणे न जोडल्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे बऱ्याच ठिकाणी पाणी लिकेज होत आहे व ते लिकेज दुरूस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळ जवळ १,२५,०००/ रूपये खर्च करावा लागत आहे.जलकुंभाचे व पाईप लाईनचे काम अगदी निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे ग्रा.प.ने ती योजना अद्याप ताब्यात घेतली नसतांनाही त्या योजनेच्या दुरुस्तीवर ग्रामपंचायतीच्या खात्यातुन खर्च केला जात आहे .

१,२५,००० लिटर ऐवजी ५७,६०० लिटरचेच जलकुंभ बांधल्यामुळे त्याला लागणारी आसारी कमी क्षमतेची वापरलेली आहे त्यामुळे खर्चही भरपूर कमी लागलेला आहे.एकंदरीत संपूर्ण योजनेचे बांधकाम अगदी निकृष्ट व अपूर्ण बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला आता पर्यंत किती बिलाचे पेमेंट झाले आहे व प्रत्यक्षात कामापेक्षा जास्त पेमेंट झाले असेल तर याला जबाबदार कोण? व चौकशीचा अहवाल अद्याप का मिळाला नाही, म्हणून एकंदरीत सदरील बाब एकदम गंभीर असल्यामुळे व त्याबाबतीत कोणीही व काहीही कार्यवाही करीत नसल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आमच्या गावातील महिला व पुरूषांना कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसण्या बाबतचे निवेदन मा जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले.