ममुराबाद येथील शिक्षिका श्रीमती कल्पना गुलाबराव चौधरी अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

-महेंद्र सोनवणे –

जळगाव – : दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनी श्रीमती कल्पना गुलाबराव चौधरी उपशिक्षिका जि.प.शाळा ममुराबाद यांना भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022” महापौर जळगाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सदर सोहळ्यास कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ,जळगाव.शिक्षक आमदार श्री. सुधीर तांबे, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती कल्पना गुलाबराव चौधरी यांचे बाबत थोडक्यात

श्रीमती कल्पना चौधरी उपशिक्षिका ,ममुराबाद या 29 वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षक सेवेत कार्यरत असून त्यांचे शिक्षण डीएड ,एम .ए बी एड. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करीत असतात. कोरोना काळातील” माझा मोबाईल अभ्यास मित्र ” ही अभिनव संकल्पना. जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांना “कला मंच “उपलब्ध करून देणे, “श्यामची आई “या पूज्य साने गुरुजी लिखित संस्कारक्षम पुस्तकाची ऑडिओ सिरीजची निर्मिती, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्यलढ्याची शौर्यगाथा या 75 क्रांतिकारकांच्या शौर्यगाथेची ऑडिओ सिरीज निर्मिती, गेल्या १० वर्षापासून खेडी खुर्द तालुका जिल्हा जळगाव येथील जि .प. शाळेतील गरीब, होतकरू दोन हुशार विद्यार्थ्यांचे “शैक्षणिक पालकत्व ” स्वीकारले आहे. या नानाविध वैशिष्ट्यपूर्ण बाबींची दखल घेत त्यांना अनेक शैक्षणिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.