ममुराबाद येथे जिल्हा परिषद शाळेत प्रेरणा सभा संपन्न.

महेंद्र सोनवणे

ममुराबाद -आज दिनांक 27 रोजी जिल्हा परिषद शाळा ममुराबाद येथे प्रेरणा सभा घेण्यात आली. त्यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री पठाण साहेब गावचे सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच संतोष कोळी, ग्रामसेवक उशीर आप्पा,तथा सदस्य अमर पाटील.ग्रामपंचायत लिपिक ज्ञानेश्वर सावळे,व पालक उपस्थित होते.यावेळी प्रतिमा पूजन तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री..फिरोज पठाण यांचे हस्ते करण्यात आले..

यावेळी उपस्थितांकडून एकवीस हजार रुपये वर्गणी जमा करण्यात आली..तसेच बऱ्याचशा नागरिकांकडून वर्गणी बाबत आश्वासने देण्यात आलेली आहे.                        या सभेवेळी शाळेच्या विकासासाठी देणगी देणाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांनी आभार मानले.  यावेळी शिक्षक हेमलता जयस्वाल..सारिका बंधान, स्वाती पाटील,कल्पना चौधरी,पूनम शिंपी,प्रीती चौधरी,ज्योती महाजन,आरती चौधरी,इत्यादी शिक्षक उपस्थित होते.      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कल्पना चौधरी यांनी केलं व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश मोरे सर यांनी मानले.