निंभोरा येथे आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते खिरोदा-चिनावल,वडगाव-निंभोरा, बलवाडी या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

रावेर प्रतिनिधी-राजेंद्र महाले –निंभोरा

येथील गावाबाहेरून जाणाऱ्या कोळीवाडा परिसरातील रिंगरोडवर आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते खिरोदा-चिनावल-वडगाव-निंभोरा-बलवाडी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करताना भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता इम्रान शेख,अनिल निकम यांसह गावातील राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,सरपंच सचिन महाले,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,माजी सरपंच डिगंबर चौधरी,माजी पं स सदस्य प्रमोद कोंडे, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, ग्रा पं सदस्य मनोहर तायडे,शेख दिलशाद,सतीश पाटील,अमोल खाचणे, स्वप्नील गिरडे,ग्रा पं सदस्या संगीता राणे,मंदाकिनी ब-हाटे,कमलबाई पंत,माजी ग्रा पं सदस्या लक्ष्मी तायडे,युनूस खान,ललित कोळंबे, शफी खान,राजीव बोरसे,हर्षल ठाकरे,युवक काँग्रेस तालुका सचिव शोएब खान,नवाज पिंजारी,बाबुराव कोळी,इकबाल शेख,प्रदीप महाले,फरीद शेख,ऍड सागर तायडे,दीपक मोरे, बाबुराव कोळी,महेंद्र महाले,यांसह स्थानिक परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामपंचायत पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी या कामाबद्दल आमदार शिरीष दादा चौधरी यांचे आभार मानले. यावेळी स्थानिकांनी सांडपाणी,बौद्ध विहार,संरक्षण भिंत आदी अडचणी बाबत आ शिरीष दादा चौधरी यांना कामासाठी विनंती केली.तर निंभोरा गावासाठी जास्तीत जास्त कामे देण्यासाठी कटिबद्ध असल्याबाबत आ शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.