भारताचे प्रथम हिंद केसरी रामचंद्र बाबुलाल पहिलवान नव्वदीच्या उंबरठ्यावर प्रकती अस्वथ

रावेर प्रतिनिधी – राजेंद्र महाले 

रावेर – मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील मूळ राहिवासी नेपानगर येथे वास्तव्यास असणारे भारताचे 1958 सालचे कुस्ती चे प्रथम हिंद केसरी रामचंद्र बाबुलाल पहिलवान यांनी हैद्राबाद येथे भरवण्यात आलेल्या कुस्तीच्या स्पर्धेत दिल्ली च्या लष्कर सेवेत असलेल्या ग्यानिराम पहिलवान ला चित पट करुन त्याला आसमान दाखवून प्रथम हिंद केसरी ची माना ची गदा पटकवली अशा मानकरी पहिलवानाची आज हलाकीची परिस्थिती झाली असून त्यानी 90 वर्ष पार केले असून ते अंथुर्णा वर पडून आहे भेटीला आल्यागेलेल्या शी ते हाताच्या खुणेने हावभाव करुन सांगतात ते बोलू शकत नाही नेपा पेपर मिल्स त्याना तटपून्ज आर्थिकसहाय्य देत आहे परंतु शासनाने त्यांना कोणतीच मदत दिली नाही असे बोलले जाते ही शोकांतिका आहे नुकतीच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा येथील जेष्ठ पत्रकार काशिनाथ शेलोडे व त्याचे मित्र लाला पटेल यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन परिवाराची आस्थावाईक चौकशी करुन त्याच्या तबेत्तीची विचारपूस केली.अशा परिस्थितीत शासनाने काहीतरी मदत करावी अशी आशा त्यांच्या परिवारातील मंडळीने केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh