डोंगर कठोरा येथील १४ वा वित्त आयोगातील कामांचा भोंगळा कारभार.

यावल –  तालुक्यातील डोंगर कठोरा येथे १४ वित्त आयोगातून अपंगांसाठी त्यांच्या बसण्यासाठी खोली बांधण्यात येत असलेली त्या खोलीचे काम मार्च महिन्या अखेर पूर्ण करायचे होते परंतु ते काम पूर्ण झाले नाही. अपंग बांधवांची खोली पूर्ण झाली नसून व खोलीवर स्लॅब पडलेला नाही किंवा खोलीला प्लास्टर, दरवाजा, खिडकी, खाली तळाला फरशी हे नसतांना १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधून अपूर्ण  कामाची ए. बी तयार कशी झाली. सरपंच ग्रामसेवक तसेच काही सदस्य यांनी संबधीत ठेकेदाराला दोन लाख रुपये रक्कम देऊ केलेले आहे. काम अपूर्ण असताना ठेकेदाराला रक्कम कशी दिली. एम बी रेकॉर्ड करताना संबंधित इंजिनियर यांनी कामाची पाहणी न करता एम बी रेकॉर्ड करून दिलेली आहे.संबंधित इंजिनियर यांनी खोटी एम बी रेकॉर्ड करून दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे जबाबदार ग्रामसेवक तसेच सरपंच व सदस्य यांनी कोणत्याही बाबतीत चौकशी न करता संबंधित ठेकेदाराला आपल्या स्वार्थासाठी कामाचा चेक दिलेला असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये चर्चांना उधान आलेले आहे.

सदर चौदावा वित्त आयोगातील निधीचा ग्रामपंचायतिचे  ग्रामसेवक तसेच सरपंच व काही सदस्य यांनी संगणमताने अपहार केल्याचे दिसत आहे.                                      सदर विषयाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून संबंधितावर काय कारवाई होईल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

 

 

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh